Mumbai News | जुलै महिन्यात पावसाने मुंबईला चांगलेच झोडपून काढले. पावसामुळे येथे जनजीवन विस्कळीत झाले होते. आता सध्या पावसाने विश्रांती घेतली आहे. मात्र, पावसामुळे साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे.राज्यात लेप्टोस्पायरोसिस, डेंग्यू, मलेरिया यासारख्या आजारांचा प्रादुर्भाव (Mumbai News) वाढला आहे.
या आजारांचे मुंबईत अनेक रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. मुंबईत जूनच्या तुलनेत जुलै महिन्यात साथीच्या आजारात अधिक वाढ झाल्याची माहिती समोर येत आहे.
मुंबईत साथीच्या रुग्णांची संख्या वाढली
मुंबईत जूनमध्ये साथीच्या आजाराचे 1395 रुग्ण सापडले होते. जुलै महिन्यात त्यात दुपटीने वाढ झाली आहे.जुलै महिन्यात 3044 रुग्ण सापडले आहेत. त्यात गॅस्ट्रो, मलेरिया, डेंग्यू, कावीळ, स्वाईन फ्लू आणि लेप्टो या आजारांच्या रुग्णांची संख्या अधिक आहे.
समोर आलेल्या आकडेवारीनुसार, जुलै महिन्यात मुंबईतील साथीच्या आजारांमध्ये गॅस्ट्रोचे सर्वाधिक 1239 रुग्ण सापडले आहे. त्याखालोखाल हिवताप 797 रुग्ण, डेंग्यू 535 रुग्ण, स्वाईन फ्लू 161 रुग्ण, कावीळ 146 रुग्ण, लेप्टोचे 141 रुग्ण आणि चिकुनगुन्याचे 25 रुग्ण आढळून आले (Mumbai News) आहेत.
या आकडेवारीमुळे मुंबईत या साथीच्या आजारांना प्रतिबंध करण्यात मुंबई महानगरपालिकेचा आरोग्य विभाग अपयशी ठरत असल्याचं म्हटलं जातंय. अगोदरच पावसामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. त्यात या साथीच्या आजारांनी डोके वर काढल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
मुंबईत साथीच्या रुग्णांची संख्या (जून-जुलै)
मलेरिया – 443 – 797
डेंग्यू – 93 – 535
लेप्टो – 28 – 141
गॅस्ट्रो – 722 – 1239
कावीळ – 99 – 146
चिकनगुनिया – 0 – 25
स्वाईन फ्लू – 10 – 161 (Mumbai News)
News Title- Mumbai News Epidemic diseases patient increases
महत्वाच्या बातम्या-
पुणेकरांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर!
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा ट्विस्ट; देवेंद्र फडणवीसांना दिल्लीत मिळणार मोठी जबाबदारी?
महिन्याच्या पहिल्याच दिवशी महागाईचा झटका; LPG सिलेंडरच्या किंमतीत वाढ
ऑगस्ट महिन्याचा पहिला दिवस शुभ की अशुभ?, वाचा आजचे राशीभविष्य
दहावी पास तरुणांसाठी थेट सरकारी नोकरीची संधी; होमगार्ड पदांसाठी भरती सुरू