Mumbai News | मुंबईतील (Mumbai News) वडाळा (Wadala) परिसरात माणुसकीला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. एका नराधम बापाने (Father) आपल्याच १५ वर्षीय पोटच्या मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार (Sexual Assault) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आरोपीने १५ वर्षीय मुलीला चाकूचा धाक (Knife Threat) दाखवत तिच्यावर अत्याचार केला.
मागील अनेक दिवसांपासून आरोपी पीडित मुलीचे अशाप्रकारे शोषण (Exploitation) करत होता. अखेर या अत्याचाराला वाचा फुटली असून, पीडितेच्या आईने (Mother) पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने वडाळा टीटी पोलीस ठाण्यात (Wadala TT Police Station) पतीविरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह (POCSO) इतर कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी नराधम बापाला बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
चाकूचा धाक दाखवून बापाकडूनच अत्याचार
मिळालेल्या माहितीनुसार, ४७ वर्षीय आरोपी बापाने मागील वर्षी डिसेंबरमध्ये चाकूचा धाक दाखवत आपल्या १५ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केला होता. “जर तू या घटनेबद्दल कोणाला सांगितलेस तर तुला जीवे मारेन,” अशी धमकी बापाने मुलीला दिली होती.
बापाच्या धमकीला घाबरून पीडित मुलीने घटनेची माहिती कोणालाही दिली नाही. यानंतर आरोपीची हिंमत आणखी वाढली आणि त्याने अशाच प्रकारे अनेकदा पोटच्या लेकीला वासनेचा शिकार बनवले. घरात कोणीही नसताना आरोपी मुलीवर लैंगिक अत्याचार करत असे. मागील अनेक दिवसांपासून हा धक्कादायक प्रकार सुरू होता. (Mumbai News)
आईला प्रकार कळताच पोलिसांत धाव
अखेर नराधम बापाच्या त्रासाला कंटाळून पीडित मुलीने सर्व प्रकाराची माहिती आपल्या आईला दिली. मुलीवर होणाऱ्या अत्याचाराची माहिती मिळताच पीडितेच्या आईने क्षणाचाही विलंब न करता थेट वडाळा टीटी पोलीस ठाणे गाठले आणि आपल्याच पतीविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी पीडितेचा जबाब नोंदवत आरोपी बापाविरोधात पोक्सोसह, चाकूचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी देणे, आदी कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. (Mumbai News)
Title: Mumbai News father repeatedly sexually assaulted 15 year old daughter in wadala