Mumbai News | महापालिकेच्या (Municipal Corporation) इमारत बांधकाम प्रस्ताव (Building Construction Proposal) विभागातून २०१५ पासून तब्बल ७०० फायली (Files) गायब झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. अजूनही हे प्रकार थांबलेले नाहीत. अर्जदाराने (Applicant) माहितीच्या अधिकारात (Right to Information – RTI) मागितलेल्या माहितीला उत्तर देताना, “संबंधित फाईल ‘मिसिंग’ (Missing) आहे,” असे लेखी उत्तर या खात्याने दिले आहे. पश्चिम उपनगरातील (Western Suburbs) मोकळ्या जागेत (Open Space) केलेल्या एका रेस्टॉरंटच्या (Restaurant) बांधकामाची माहिती अधिकारात मागवण्यात आली होती. (Mumbai News)
सामाजिक कार्यकर्त्याचा (Social Activist) पाठपुरावा आणि आमदारांचा (MLA) आरोप
सामाजिक कार्यकर्ते गॉडफ्रे पिमेंटा (Godfrey Pimenta) यांनी यासंदर्भात पाठपुरावा केला होता. त्यांनी अर्ज करून, मोकळ्या जागेवर अतिक्रमण (Encroachment) केलेल्या रेस्टॉरंटला मंजुरी (Approval) देण्यात आली आहे का, अशी विचारणा केली होती. तेव्हा त्यांना फाईल ‘मिसिंग’ असल्याचे उत्तर देण्यात आले. आमदार अमित साटम (Amit Satam) यांनी २०१५ मध्ये विधानसभेत (Assembly) उपस्थित केलेल्या एका प्रश्नादरम्यान, इमारत बांधकाम विभागात ५० हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप केला होता. त्यावेळी सरकारकडून दोषींवर कारवाई करण्यासाठी कालबद्ध चौकशीचे (Time-bound Inquiry) आश्वासन (Assurance) देण्यात आले होते. तसेच, नुकत्याच मांडलेल्या कॅगच्या (CAG) अहवालातही (Report) पालिकेतील (Municipal Corporation) महत्त्वपूर्ण त्रुटी (Lapses) उघडकीस आल्या आहेत. (Mumbai News)
चौकशीची आणि कारवाईची मागणी
“पालिकेच्या इमारत बांधकाम खात्यातून ७०० फायली गहाळ झाल्या आहेत. २०१५ मध्ये विधानसभेत हा घोटाळा मी उघडकीस आणला होता,” अशी प्रतिक्रिया आमदार अमित साटम यांनी दिली आहे. अर्जदार पिमेंटा यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. “इमारत बांधकाम विभागाकडून गहाळ झालेल्या फाईल्सची सखोल आणि कालबद्ध चौकशी सुरू करा. भ्रष्टाचार आणि मनी लाँड्रिंगच्या (Money Laundering) गंभीर आरोपांच्या चौकशीसाठी लाचलुचपत प्रतिबंधक ब्यूरो (Anti-Corruption Bureau), अंमलबजावणी संचालनालयास (Enforcement Directorate) सांगावे. निष्काळजीपणा, संगनमत किंवा भ्रष्टाचारासाठी दोषी अधिकारी आणि संस्थांवर कारवाई करा. सर्व विभागीय नोंदी आणि मंजूर योजनांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी मजबूत यंत्रणा कार्यान्वित करा,” अशी मागणी त्यांनी केली आहे. (Mumbai News)
Title : Mumbai News Missing Files from Municipal Corporation
महत्वाच्या बातम्या-
सैफ अली खानच्या हल्लेखोराबाबत धक्कादायक माहिती समोर!
पुण्याच्या घटस्फोटाच्या निकालाची देशभर चर्चा, कोर्टानं पतीला दिले कठोर आदेश
सर्वात वाईट पदार्थांच्या यादीत भारतातील पदार्थाचा समावेश, तुम्हीही खात असाल तर सावधान
‘थँक यू डॉक्टर्स, मला…’; सैफ अली खानचा डॉक्टरांशी पहिला संवाद