“देव तारी त्याला कोण मारी”; भीषण अपघात, बाप-लेक सुदैवाने बचावले, नेमकं काय घडलं?

Mumbai News Speeding Car Rams Rickshaws One Dead Father Son Saved

Mumbai News | नवी मुंबईतून (Navi Mumbai) अपघाताची (Accident) एक हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. भरधाव वेगाने जाणाऱ्या एका कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दोन रिक्षांना (Rickshaws) जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात घनश्याम जयस्वाल (Ghanshyam Jaiswal) (46) या रिक्षाचालकाचा (Rickshaw Driver) दुर्दैवी मृत्यू (Death) झाला आहे. सुदैवाने, या अपघातातून बाप-लेक (Father-Son) थोडक्यात बचावले आहेत. अपघाताच्या काही मिनिटांपूर्वीच चहा पिण्यासाठी (To Drink Tea) रिक्षातून उतरल्याने त्यांचा जीव वाचला. सायन-पनवेल महामार्गावर (Sion-Panvel Highway) हा अपघात घडला. पोलिसांनी (Police) आरोपी कारचालकाला (Car Driver) अटक (Arrest) केली असून, या घटनेचा पुढील तपास सुरू आहे. (Mumbai News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायन-पनवेल महामार्गावर मुंबईच्या (Mumbai) दिशेने एक भरधाव कार निघाली होती. प्रवासादरम्यान चालकाला डुलकी लागल्याने (Due to Sleepiness) त्याने डाव्या बाजूला रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दोन रिक्षांना जोरात धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की रिक्षाचा अक्षरशः चेंदामेंदा झाला.

ऐनवेळी रिक्षातून उतरल्याने वाचले प्राण

या अपघातापूर्वी, रिक्षाचालक राजेंद्र वनकळस (Rajendra Wankalas) हे आपल्या मुलासह रिक्षा महामार्गावर लावून चहा पिण्यासाठी उतरले होते. दोघेही टपरीवर (Tea Stall) चहा पित असताना हा अपघात घडला. ऐनवेळी रिक्षातून उतरल्याने राजेंद्र वनकळस आणि त्यांच्या मुलाचे प्राण वाचले. मात्र, दुसऱ्या रिक्षात झोपलेल्या 46 वर्षीय घनश्याम जयस्वाल यांचा जागीच मृत्यू झाला.

घनश्याम हे घरातील कर्ता पुरुष होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि तीन मुली असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने जयस्वाल कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. (Mumbai News)

कारचालकास अटक, तपास सुरू

या घटनेनंतर, अपघातातून बचावलेले रिक्षाचालक राजेंद्र वनकळस यांनी संबंधित कारचालकाविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार (Complaint) दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी मूळचे मानखुर्दचे (Mankhurd) आणि व्यवसायाने अभियंता (Engineer) असलेले 26 वर्षीय विष्णू राठोड (Vishnu Rathod) यांना अटक केली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Mumbai News)

Title : Mumbai News Speeding Car Rams Rickshaws One Dead Father Son Saved

 

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .