Mumbai News | डोंबिवलीमध्ये (Dombivli) आज एक धक्कादायक आणि चमत्कारिक घटना घडली. एका १३ मजली इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून खेळता खेळता एक दोन वर्षांचा चिमुरडा खाली पडला. मात्र, त्याचवेळी भावेश म्हात्रे (Bhavesh Mhatre) नावाचा तरुण देवासारखा धावून आला आणि त्याने या चिमुरड्याचा जीव वाचवला. (Mumbai News)
भावेशचा झेल हुकला असला तरी चिमुरडा त्याच्या पायावर पडल्याने त्याला मोठी दुखापत झाली नाही आणि त्याचा जीव वाचला. या घटनेचा व्हिडिओ (Video) सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral) झाला असून भावेशचे सर्वत्र कौतुक होत आहे.
२५ जानेवारी रोजी दुपारी १ वाजून ४९ मिनिटांनी डोंबिवलीतील अनुराज हाईट्स टॉवर (Anuraj Heights Tower) येथे ही हृदयस्पर्शी घटना घडली. गावदेवी मंदिराजवळ (Gavdevi Temple) असलेल्या देवीचा पाडा (Devicha Pada) येथील या १३ मजली इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून हा दोन वर्षांचा चिमुरडा तोल जाऊन खाली पडू लागला.
मात्र, याच सोसायटीत राहणाऱ्या भावेश म्हात्रे या तरुणाने प्रसंगावधान दाखवत या चिमुकल्याचा जीव वाचवला. या घटनेत चिमुरडा किरकोळ जखमी झाला आहे.
सिनेमाला लाजवेल असा थरार
एखाद्या सिनेमाला लाजवेल असा हा प्रसंग डोंबिवलीतील देवीचा पाडा परिसरात घडला. अनुराज हाईट्स टॉवर या १३ मजली इमारतीच्या आवारात भावेश म्हात्रे हा तरुण काही रहिवाशांसोबत गप्पा मारत उभा होता. त्याचवेळी तिसऱ्या मजल्यावरून एक दोन वर्षांचा चिमुरडा खाली पडताना त्याला दिसला. क्षणाचाही विलंब न लावता भावेशने चिमुरड्याला वाचवण्यासाठी धाव घेतली.
यावेळी भावेशसोबत आणखी दोन जण होते, पण ते घाबरून तिथून पळून गेले. मात्र, भावेशने हिंमत न हारता चिमुरड्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. त्याचा झेल हुकला असला तरी चिमुरडा भावेशच्या पायावर पडला आणि त्यामुळे त्याचा जमिनीवर पडतानाचा वेग कमी झाला. यामुळे चिमुरड्याला मोठी दुखापत झाली नाही. (Mumbai News)
Title: Mumbai News two year old boy saved by youth in dombivli