बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

दिलासादायक! मुंबईतील सक्रिय कोरोनाबाधितांच्या संख्येत घट; जाणुन घ्या आजची आकडेवारी

मुंबई | महाराष्ट्रात सध्या कोरोनाचं संकट घोंगावत असल्याचं पाहायला मिळत आहेत. कोरोनाची वाढती रुग्णसंख्या हा चिंतेचा विषय बनला असताना मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कोरोनाबाधितांची आजची  आकडेवारी ही काही प्रमाणात दिलासादायक आहे.

मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये 24 तासात एकूण 1 हजार 431 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच आज एकुण 1 हजार 470 रुग्ण कोरोनामुक्त होऊन त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. गेल्या काही दिवसात कोरोना रुग्णसंख्या वाढत असताना आजची आकडेवारी ही काहीशी दिलासादायक असल्याचं पाहायला मिळत आहे.

मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये सध्या 28 हजार 410 सक्रिय कोरोनाबाधित रुग्ण असून, कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांचा दर हा 93 टक्क्यांवर असल्याचं महापालिकेकडून सांगण्यात आलं आहे. आजपर्यंत बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील एकूण 6 लाख 52 हजार 686 रुग्ण कोरोनामधून बरे झाले आहेत. सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या घटल्याने मुंबईची कोरोनामुक्तीकडे आगेकुच होत असल्याचं सकारात्मक चित्र पाहायला मिळत आहे.

रुग्ण वाढीचा दर हळूहळू कमी होईल, असा विश्वास मुंबई महापालिकेकडून व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रासह मुंबईतील रुग्णसंख्या ही झपाट्याने वाढत होती. पण मुंबईतील रुग्णसंख्या ही मागच्या काही दिवसात हळुहळु कमी होत असल्याचं पाहायला मिळत  आहे.

थोडक्यात बातम्या

11 हजारांसाठी रुग्णालयाने ठेवून घेतलं महिलेचं मंगळसूत्र; माणुसकीला काळीमा फासणारी घटना

पुण्यातील नव्या कोरोना रूग्णसंख्येत लक्षणीय घट; कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या अधिक

क्रिकेटप्रेमींसाठी खूशखबर! आयपीएलचे सामने आता ‘या’ देशात खेळले जाणार; BCCI करणार घोषणा?

कुटुंबीयांनी प्रेमविवाहाला नकार दिल्याने पुण्यातील प्रेमीयुगुलाने उचललं ‘हे’ धक्कादायक पाऊल

औरंगाबादमध्ये शेतकरी कुटुंबाला मारहाण; गुन्हा दाखल करण्यास पोलिसांची टाळाटाळ, पाहा व्हिडिओ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More