Top News आरोग्य कोरोना मुंबई

मुंबईकरांनो मास्क घातला नसेल तर आता रस्ता झाडावा लागेल!

मुंबई | कोरोनाचा विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी मुंबई महापालिकेने मास्कची सक्ती केली आहे. तर मास्क न घालणाऱ्या नागरिकांना दंडही ठोठवला जातोय. मात्र तरीही अनेकजण मास्कचा वापर करत नसल्याने मुंबई महापालिकेने आता कठोर पाऊल उचलण्यात येण्याची शक्यता आहे.

अनेकजण सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करत नाहीत. अशा व्यक्ती आढळल्या आणि जर त्यांनी 200 रुपये दंड भरण्यास नकार दिला किंवा वाद घातल्यास तासभर रस्ता झाडावा लागू शकतो.

मुंबई महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन उप-कायद्यांनुसार ही शिक्षा लागू करण्यात येण्याची शक्यता आहे. मास्क न घालणाऱ्या व्यक्तीला रस्त्याची झाडलोट करण्यासोबत भिंतींवरील चित्र साफ करण्याची शिक्षा देखील होऊ शकते.

नियम मोडून देखील ज्या व्यक्ती ही कामं करण्यास नकार देतील त्यांच्याविरोधात पोलिसात तक्रारही दाखल होऊ शकते.

महत्वाच्या बातम्या-

अनेकांना भाजप सोडण्याची इच्छा आहे पण….- एकनाथ खडसे

राष्ट्रवादीने सिंचन घोटाळ्याचा प्रमुख फोडला तरी त्याचा उपयोग होणार नाही, कारण…- राम शिंदे

मुंबई- सिटी सेंटर मॉलचे दोन मजले जळून खाक; आदित्य ठाकरेंची घटनास्थळी भेट

“विरोधी पक्षनेत्यांनी आपले वजन वापरुन राज्याला विशेष मदत पॅकेज मिळवून द्यावं”

शिवसेनेच्या आमदाराकडून राष्ट्रवादी खासदार सुनील तटकरे यांच्याविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या