मुंबईत देशातील सर्वात महाग पेट्रोल, अहमदाबादेत तुलनेनं स्वस्त!

मुंबई | देशातील पेट्रोल दरवाढ काही थांबण्याचं नाव घेत नाहीये. देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईत पेट्रोलचे दर गगनाला भिडलेत. तुमचा विश्वास बसणार नाही मात्र मुंबईत 80.10 रुपये प्रतिलीटर दराने पेट्रोल विकलं जातंय. 

सध्या पेट्रोलचे दर रोज बदलत असतात, त्यामुळे पेट्रोलचे वाढते दर सहसा लक्षात येत नाहीत. मात्र गेल्या काही दिवसांपासून पेट्रोलच्या दरात सातत्याने वाढ होतेय. सध्या देशातील सर्वाधिक महाग पेट्रोल मुंबईत विकलं जातंय. 

मुंबईसोबतच देशाच्या इतर शहरांमध्ये पेट्रोलचे दर कमी जास्त आहेत. राजधानी दिल्लीत 72.23 रुपये तर अहमदाबादमध्ये 71.83 रुपये दराने पेट्रोल विकलं जातंय.