मुंबई पोलिसांना मोठा दिलासा, ड्युटी आता 8 तासांचीच!

संग्रहीत फोटो

मुंबई | पोलिसांच्या ड्युटीचा प्रश्न कायमच मांडला जात होता मात्र त्यांना दिलासा मिळत नव्हता. मुंबई पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी मात्र मुंबई पोलिसांना दिलासा दिलाय.

आजपासून मुंबई पोलिसांची ड्युटी 8 तासांचीच असेल अशी घोषणा दत्ता पडसलगीकर यांनी केलीय. ‘मिशन 8 अवर्स’ या कार्यक्रमात त्यांनी ही घोषणा केली. 

देवनार पोलीस ठाण्यात यापूर्वी प्रायोगिक तत्त्वावर 8 तासाच्या ड्युटीची चाचपणी करण्यात आली होती. मात्र आजपासून मुंबईच्या सर्वच पोलीस ठाण्यांमध्ये पोलिसांना 8 तासांची ड्युटी असणार आहे.