मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी अनेक दिवसांपासून भोंग्याचा मुद्दा उपस्थित केला आहे. या भोंग्याच्या मुद्द्यावरुन राज्यात गदारोळ निर्माण झाला आहे. उद्या तर राज्यात जोरदार राडा पहायला मिळणार असल्याचं चित्र दिसतंय.
राज ठाकरे यांनी हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर किती मशिदींवरील भोंगे हे अधिकृत आहेत. याबाबत ही चर्चा सुरु झाली होती. पण आता मुंबई पोलिसांनी 803 मशिदींना भोंग्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे वाद आणखी चिघळण्याची भीती आहे.
मुंबईत एकूण 1144 मशिदी आहेत. ज्यापैकी 803 मशिदींना भोंग्यासाठी परवानगी दिल्याची माहिती आहे. नियमांचे पालन करून भोंगे वाजवण्याची परवानगी पोलिसांकडून देण्यात आली आहे.
दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्याच्या आंदोलनावर ठाम आहेत. ज्या ठिकाणी मशिदीवर भोंगे वाजतील त्या ठिकाणी हनुमान चालीसा लावण्याचा आदेश त्यांनी पक्षाला आणि हिंदू बांधवांना दिला आहे
थोडक्यात बातम्या –
‘आम्ही आमचा हट्ट सोडणार नाही’; राज ठाकरेंचा पुन्हा गंभीर इशारा
”…त्यासाठी कुणाच्याही परवानगीची वाट पाहू नका’; मुख्यमंत्र्याचे आदेश
मोठी बातमी ! राज ठाकरेंच्या घराबाहेर मनसैनिकांची गर्दी, पोलिसांचा ताफा वाढवला
“राज्याच्या बाहेरुन काही गुंड आणून मुंबईत गडबड करण्याचा डाव”
चिडलेल्या न्यूज अॅंकरनं अभिनेत्याला काढलं स्टूडिओतून बाहेर, पाहा ‘तो’ व्हिडीओ
Comments are closed.