Top News महाराष्ट्र मुंबई

पोलिसांची धडक कारवाई, 10 दरोडेखोरांच्या मुसक्या आवळल्या!

मुंबई | मोबाईल स्टोअर तसेच एटीएम फोडण्याच्या तयारीत असलेल्या दरोडेखोरांना मुंबई पोलिसांनी चांगलाच दणका दिला आहे. गेल्या तीन दिवसात करण्यात आलेल्या कारवाईमध्ये तब्बल 10 दरोडेखोरांना अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या या कामगिरीचं सध्या चांगलंच कौतुक होत आहे.

मोबाईल स्टोअर फोडण्याच्या तयारीत असलेल्या दरोडेखोरांना 9 फेब्रुवारी रोजी कांदीवली पूर्व येथून अटक करण्यात आली आहे, तर एटीएम फोडण्याच्या तयारीत असलेल्यांना 11 फेब्रुवारी रोजी मालाड पूर्व येथून अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दोन्ही टोळ्यांकडून गुन्ह्यासाठी वापरण्यात येणारी हत्यारं जप्त केली आहेत.

मालाड पूर्वे भागातील पिंपरीपाडा येथे एटीएम फोडण्यासाठी दरोडेखोरांचा एक गट जमल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तातडीने दोन पथकं तयार करुन कारवाईसाठी रवाना केली. यावेळी पाच जणांना पकडण्यात या पथकाला यश आलं, मात्र या टोळीतील तीन जण पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाले. याप्रकरणी पोलिसांनी सुबोध साळवी (वय-26), सौरभ पोश्ते (वय-23), सिद्धेश इंगळे (वय-20), समीर खान (वय-22) आणि समीर पार्टे (वय-27) या आरोपींना अटक केली आहे.

दुसरीकडे मंगळवारी पहाटे आरोपींचा एक गट एका मोबाईल स्टोअरवर दरोडा टाकणार असून त्याची वडारपाडा येथे मिटींग असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकून 5 जणांना अटक केली. इम्रान अन्सारी, निसार शेख, झुल्फिकार शेख, शफिकुला अतिकुला अशी या प्रकरणातील आरोपींची नावं आहेत. यातील आरोपींनी नाशिकमध्ये पाच लाख रुपयांचे फोन स्टोअर लुटल्याची कबुली दिली असून त्यांना पुढील तपासासाठी नाशिक पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.

थोडक्यात बातम्या-

गोल्डनमॅन सचिन शिंदे हत्या प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई

‘इथलेच काय इंटरनॅशनल डॉनही मला ओळखतात, घाबरायचं नाही’; भाजप नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य

शेतकऱ्याच्या पोराची कमाल, नोकरी सोडून घरच्या छतावर करून दाखवली केसरची शेती

तरुणीच्या आत्महत्या प्रकरणाला धक्कादायक वळण, ‘त्या’ मंत्र्याचे फोटो व्हायरल!

“भगतसिंह कोश्यारी हे गोव्याचेही राज्यपाल, त्यांनी अधुनमधून गोवा सरकारचंही विमान वापरावं”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या