बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अंबानी स्फोटकं प्रकरणातील ‘ती’ कार मुंबई पोलिसांची; एनआयएच्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर!

मुंबई | प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर 25 फेब्रुवारी 2021 ला स्फोटकांनी भरलेली स्कार्पिओ गाडी आढळून आल्याने परिसरात खळबळ माजली होती. स्फोटकं ठेवल्यानंतर तिथे दोन गाड्या सीसीटीव्ही मध्ये दिसून आल्या होत्या.त्यापैकी पळुन जाण्यासाठी वापरण्यात आलेली पांढरी इनोव्हा गाडी मुंबई पोलिसांच्याच गुप्तवार्ता विभागाची असल्याची माहिती आता पुढे आली आहे. सचिन वाझे यांच्या अटकेनंतर राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजेच एनआयएच्या चौकशीदरम्यान अनेक गोष्टींचा उलगडा होत असताना पाहायला मिळत आहे.

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटके असलेली स्काॅर्पिओ गाडी उभी केल्यानंतर चालकाने पळुन जाण्यासाठी पांढऱ्या रंगाच्या इनोव्हा गाडीचा वापर केला होता. संबंधित इनोव्हा कार मुंबई पोलिसांच्या गुप्तवार्ता विभागाची असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे हे प्रकरण आता अजूनच गुंतागुंतीचं बनत चालल्याचं पाहायला मिळत आहे.

अन्वय नाईक प्रकरणात अर्णव गोस्वामी यांना अटक करण्यासाठी जी कार वापरण्यात आली होती. तीच पांढरी इनोव्हा कार बनावट नंबरप्लेट लावून  स्फोटकं ठेवल्यानंतर पळुन जाण्यासाठी वापरण्यात आली असल्याचंही सांगितलं जात आहे. यासंदर्भात माध्यमात बातम्याही प्रकाशित झाल्या आहेत. सचिन वाझे यांच्याबरोबर काम करणार्‍या पोलिसांच्या गुप्तवार्ता विभागाच्या काही अधिकाऱ्यांची राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून चौकशी करण्यात आली त्यावेळी ही माहिती समोर आली आहे.

संबंधित प्रकरणातील स्काॅर्पिओ गाडी मनसुख हिरेन यांच्या मालकीची होती. मनसुख हिरेन यांची चौकशी सुरू असतानाच त्यांचा संशयास्पद मृत्यू झाला. त्यामुळे या प्रकरणाचा गुंता आणखी वाढत गेला. आता स्काॅर्पिओचा चालक ज्या इनोव्हा गाडीतून फरार झाला ती गाडी राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या ताब्यात असून पुढील तपास सुरू आहे. तसेच मुंबई पोलिसांच्या एका विभागाची ही गाडी असल्याचं समोर आल्याने आता या प्रकरणात आणखी किती गोष्टींचा उलगडा होणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

या प्रकरणाचा तपास सुरू झाल्यानंतर पोलिसांनी पांढऱ्या इनोव्हाचा शोध सुरू केला, त्यासाठी 800 सीसीटीव्ही कॅमेराचे फुटेज तपासून 30 पेक्षा अधिक लोकांचे जबाब पोलिसांनी नोंदवून घेतले होते. मुंबईतील मुलुंड टोल नाक्यावर या पांढऱ्या इनोव्हामध्ये दोन व्यक्ती असल्याचं दिसून आलं होतं. परंतु, आता ही गाडी सापडली असून ती मुंबई पोलिसांचीच असल्याचं स्पष्ट होत आहे.

थोडक्यात बातम्या

“दैव जाणिले कुणी?” या उक्तीप्रमाणे ते चौघे मरणाच्या दारातून परतले, पाहा व्हिडिओ!

आसाम वगळता इतर राज्यात भाजपचा पराभव होईल- शरद पवार

‘या’ कार्सवर मिळतोय 60 हजारांचा डिस्काऊंट; जाणून घ्या अधिक माहिती

‘हा चमत्कार सध्याच्या राज्यपालांनी केलाय’; शरद पवारांचा कोश्यारींना टोला

…अन् तसं झालं तर ठाकरे सरकार देखील पडू शकतं- कंगणा राणावत

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More