बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

गृहमंत्र्यांची खुर्ची सेफ, मुंबईच्या पोलीस आयुक्तांची मात्र उचलबांगडी

मुंबई |  सध्या महाराष्ट्रात चर्चेत असलेल्या सचिन वाझे यांच्या अटकेनंतर मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या अडचणी वाढल्या होत्या. पोलीस आयुक्त आपली कारकीर्द पूर्ण करतील का?, असे सवालही उपस्थित होऊ लागले होते. देशातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर स्फोटकांची गाडी आणि मनसुख हिरेन यांचा मृत्यू या प्रकरणाचा तपास करणाऱ्या तपास अधिकाऱ्यालाच अटक झाल्यानंतर मुंबई पोलीस दलाच्या प्रतिमेवर शंकाकुशंका निर्माण केल्या जाऊ लागल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने वरिष्ठ अधिकाऱ्यांची बदली केली आहे.

राज्याच्या पोलीस महासंचालकपदी रजनीश शेठ यांच्यकडे कार्यभार सोपवण्यात आला आहे. तर मुंबई पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांची बदली झाली असून हेमंत नगराळे नवे मुंबई पोलीस आयुक्त असणार आहेत. त्यासोबतच संजय पांडे यांच्याकडे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. परमबीर सिंह यांच्याकडे गृह रक्षक दलाची जबाबदारी देण्यात आली आहे.

राज्य सरकारने बदलींच्या घेतलेल्या या निर्णयाबाबत राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विट करत माहिती दिली आहे. सचिन वाझेंना अटक झाल्यामुळे मुंबई पोलीस दलातच खळबळ उडाली आहे. मात्र या प्रकरणामुळे सरकारने थेट मुंबई पोलीस आयुक्तांची उचलबांगडी करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकरणामध्ये मनसुख हिरेन यांच्या पत्नीने सचिन वाझे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वाझेंना बोलावून घेतलं होतं मात्र त्यावेळी त्यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आणि सर्व गोष्टी मुंबई क्राईम ब्रांचच्या सर्व वरिष्ठ अधिकार्‍यांपासून लपवून ठेवल्या.

दरम्यान, या प्रकरणात अनेक घडामोडी समोर आल्या त्यासोबतच गोष्टी लपवत गुप्तता पाळण्यात आली आहे. मात्र सचिन वाझेंना अटक करण्यात आल्यामुळे पोलीस दलातील इतरही अधिकारी अडचणीत येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर गृहमंत्री अनिल देशमुख यांना पदावरुन हटवणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या.

थोडक्यात बातम्या- 

गृहमंत्र्यांची खुर्ची सेफ, मुंबईच्या पोलीस आयुक्तांची मात्र उचलबांगडी

कोरोना लसीवर आरोग्यमंत्री राजेश टोपेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

धक्कादायक! पोटच्या मुलाने जन्मदात्या आईवर उचलला हात, सहन न झाल्याने माऊलीने सोडला प्राण, पाहा व्हिडीओ

‘सिंघम’ मधील काजल अग्रवालचं हॉट फोटोशूट, पाहा तिचे अदाकारी फोटोझ!

कुस्तीत झालेला पराभव सहन झाला नाही; फोगट भगिनींच्या बहिणीनं उचललं धक्कादायक पाऊल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More