माविआच्या मोर्चाच्याआधी मुंबई पोलिसांनी घातल्या ‘या’ अटी

मुंबई | भाजपचे (BJP) नेते आणि राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराज आणि इतर महापुरुषांचा वारंवार झालेला अपमान. तसेच महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाचा सुरु असलेला प्रश्न या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आक्रमक झाली असून महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) आज 17 महामोर्चा काढण्यात येतोय.

काही अटी शर्थींसह या मोर्चाला परवानगी देण्यास पोलिसांनी होकार दिला आहे. तसेच या महामोर्चाचा रोडमॅपही ठरला आहे. परवानगी आधी मुंबई पोलिसांनी काही अटी ठेवल्याची माहिती समोर आली.

मोर्चामध्ये वापरण्यात येणारी वाहने ही सुस्थितीमध्ये असावीत. वाहन चालकाकडे उचित परवाना आहे, वाहन चालकाने मादक पदार्थांचे सेवन केलेले नसावं.

वाहन चालक पूर्ण वेळ वाहनासोबत राहिल या बाबींची खातरजमा व पूर्तता करण्याची जबाबदारी सर्वस्वी आयोजकांची राहील. मोर्चामध्ये कोणत्याही प्रकारची शस्त्रे, लाठी, पुतळे वगैरे घेऊन जाण्यास मनाई आहे.

महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37 (3) अन्वये तत्कालीन कायदा व सुव्यस्थेची परिस्थिती पाहून पदयात्रेचा परवाना रद्द करण्याचे अधिकार पोलिसांना आहेत, याची नोंद घ्यावी.

12) महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37 (3) अन्वये तत्कालीन कायदा व सुव्यस्थेची परिस्थिती पाहून पदयात्रेचा परवाना रद्द करण्याचे अधिकार पोलिसांना आहेत, याची नोंद घ्यावी.

महत्त्वाच्या बातम्या-