मुंबई | टीआरपी घोटाळा प्रकरणातील आरोपी महामुव्ही वाहिनीचा सर्व्हर आणि कंटेंट सील करण्यात आला आहे. त्यामुळे आता चॅनलला प्रसारण करता येणार नाही.
जुहू पोलीस स्टेशनमध्ये नोंदवण्यात आलेल्या कॉपीराईट प्रकरणात महामुव्ही विरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. यानंतर गुन्हे शाखेने ‘महामुव्ही’ वाहिनीच्या प्रवर्तक कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय वर्मा यांना अटक केली होती. आता महामुव्ही वाहिनीचा सर्व्हर आणि कंटेंट सील करण्यात आला आहे.
महामुव्हीपासून लावारिस, जंजीर, मोहब्बत के दुश्मन, मुकद्दर का सिकंदर आणि जादूगार अशा सिनेमाची कंटेंट जप्त केली आहे.
महामुव्ही चॅनलचा आर्थिक लेखापरीक्षण केलं जाणार आहे. तसेच दर्शन सिंह यांच्यावर एलओसी जारी करण्यात आली आहे.
थोडक्यात बातम्या-
केंद्रीय गृह मंत्रालयाकडून महाराष्ट्राच्या 57 शूर पोलिसांना पदक जाहीर
टाटांची बहुचर्चित सफारी 26 जानेवारीला लाँच होणार; जाणून घ्या वैशिष्ट्यं
पोटच्या मुलींची हत्या केली; म्हणाले, सकाळी पुन्हा जिवंत होणार!
न्यायालयाच्या ‘त्या’ निर्णयावर रितेश देशमुखची उघड उघड नाराजी; म्हणाला…
…अन् ‘आयर्नमॅन’ कृष्णप्रकाश यांनाही अश्रू आवरता आले नाहीत, पाहा व्हिडीओ-