Top News मनोरंजन

कंगणा हाजीर हो! कंगणासह बहिणीला मुंबई पोलिसांनी तिसऱ्यांदा बजावला समन्स

मुंबई | बॉलिवूड अभिनेत्री कंगणा राणावतला मुंबई पोलिसांनी पुन्हा एकदा समन्स बजावला आहे. पोलिसांनी समन्स बजावण्याची ही तिसरी वेळ आहे. कंगणासह तिची बहिण रंगोलीला देखील पुन्हा एकदा समन्स बजावण्यात आलाय.

पोलिसांनी तिसऱ्यांदा समन्स बजावला असून कंगणा आणि रंगोलीला वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये चौकशीसाठी हजर राहावं लागणारे. त्यानुसार येत्या 23 नोव्हेंबरला कंगणाला, तर 24 नोव्हेंबरला रंगोलीला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेत.

यापूर्वी दोन वेळा कंगणा आणि रंगोली या दोघींना चौकशीसाठी समन्स बजावण्यात आला होता. यामधील एका समन्सला उत्तर देताना दोघींनी घरात लग्न असल्याचं कारण पुढे केलं होतं.

कंगणा आणि तिच्या बहिणीने केलेल्या पोस्टमुळे हिंदू आणि मुस्लीम समाजात कलाकारांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप करण्यात आला होता. यासंदर्भात वांद्रे कोर्टात याचिका दाखलही करण्यात आलीये.

महत्वाच्या बातम्या-

‘बिहारच्या विकासाठी भाजप नत्यांनी एकत्र काम करावं, त्यामुळे महाराष्ट्रात शांतता नांदेल’

“संजय राऊतांना आता कळलं असेल, राज ठाकरे मुख्यमंत्र्याऐवजी राज्यपालांना का भेटायला गेले”

“संजय राऊत हे नेलकटरला घाबरतात आणि वार्ता मात्र तलवारीच्या करतात”

धक्कादायक! प्रेयसीवर हल्ला करत स्वत:च्या तोंडात फोडला सुतळी बॉम्ब

भाजप नेते राम कदम यांना मुंबई पोलिसांनी घेतलं ताब्यात

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या