मुंबई | अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) व आमदार रवी राणा (Ravi Rana) ‘मातोश्री’ बाहेर हनुमान चालिसा पठण करण्यासाठी मुंबईत दाखल झाले आहेत. राणा दांपत्य मुंबईत दाखल झाल्यानंतर शिवसैनिकांनी ‘मातोश्री’ व ‘वर्षा’ बंगल्याबाहेर गर्दी करायला सुरूवात केली आहे.
राणा दांपत्य मुंबईत दाखल झाल्यानंतर राज्यातील वातावरण चांगलंच तापलेलं पाहायला मिळत आहे. नवनीत राणा व रवी राणा त्यांच्या खार येथील निवासस्थानी असून मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) त्यांना मोठा झटका दिला आहे.
मुंबई पोलिसांनी राणा दांपत्याला कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी 149 CRPC नुसार नोटीस बजावली आहे. राणा दांपत्याला मुंबई पोलिसांकडून प्रतिबंधात्मक नोटीस बजावण्यात आली असून जर कायदा व सुव्यवस्था बिघडली तर त्याला नवनीत राणा व रवी राणा जबाबदार असतील.
दरम्यान, राणा दांपत्य थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेणार असून आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. नवनीत राणा व रवी राणा मातोश्री बाहेर हनुमान चालिसा पठण करणार असल्याने शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यामुळे एकंदर परिस्थिती बघता पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला आहे.
थोडक्यात बातम्या-
“भाजपला मार्केटिंगसाठी असे सी ग्रेड स्टार लागतात”
“बंटी बबली मुंबईत पोहोचले तर पोहचू द्या, त्यांना अजून…”
‘भाजप इतका जूना पक्ष की…’; चंद्रकांत पाटलांच्या ‘त्या’ वक्तव्याची जयंत पाटलांनी उडवली खिल्ली
नवाब मलिकांना दिलासा नाहीच, ‘ती’ याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली
गुणरत्न सदावर्तेंचा पाय आणखी खोलात, आता…
Comments are closed.