Top News महाराष्ट्र मुंबई

लॉकडाऊनसंदर्भात व्हायरल होत असलेला ‘हा’ मेसेज खोटा

Loading...

मुंबई | राज्यात सध्या लॉकडाऊन सुरु असून त्यासंदर्भात अनेक मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मात्र यामध्ये लॉकडाऊन शिथील करण्यात आल्याचा मेसेज व्हायरल झालाय, मात्र हा मेसेज खोटा असल्याचं मुंबई पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.

सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला लॉकडाऊन शिथील झाल्याचा मेसेज खोटा आहे. कोणीही या मेसेजवर विश्वास ठेवू नये. लॉकडाऊनची आधीप्रमाणेच प्रभावीपणे अंमलबजावणी केली जात आहे, त्यामुळे अशा कुठल्याही फेक मेसेजवर विश्वास ठेवू नये, असं मुंबई पोलिसानी म्हटलंय.

मुंबई पोलिसांनी यासंदर्भात एक ट्विट केलं आहे. काही अडचण असेल किंवा सत्य जाणून घ्यायचं असेल तर १०० नंबरवर संपर्क करा किंवा आम्हा टॅग करुन ट्विट करा, असं आवाहनही मुंबई पोलिसांकडून करण्यात आलं आहे.

दरम्यान, कोरोनाचा प्रसार वाढल्यापासून सोशल मीडियामध्ये अफवांचं पीक वाढलं आहे. अशाप्रकारे अफवा पसरवणाऱ्यांवर सरकारने कडक कारवाई करण्याची भूमिका घेतली आहे. फेक मेसेज शेअर केल्यामुळे राज्यातील अनेकांवर गुन्हे देखील दाखल करण्यात आलेले आहेत.

Loading...

ट्रेंडिंग बातम्या-

पॅरोलवर बाहेर आलेल्या कुख्यात डॉन अरुण गवळीची गरजूंना मदत, पाहा व्हिडीओ

‘भारतीय मनाने कणखर असून त्यांचं मनोबलच कोरोनावर मात करेल’; चीनमधील तज्ञांकडून कौतुक

Loading...

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या