बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

एनसीबी अधिकारी समीर वानखेडेंवर मुंबई पोलिसांची पाळत?; व्हिडीओ पुराव्यासहीत वानखेडेंची तक्रार

मुंबई |  गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेले एनसीबी अधिकारी समीर वानखेडे हे आता आणखी एका मुद्द्यामुळे चर्चेत आले आहेत. काही दिवसांपुर्वी कार्डेलिया या क्रुझवर एनसीबीने मोठी कारवाई केली होती. या ड्रग्ज प्रकरणात समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखालील टीमने प्रसिद्ध अभिनेता आर्यन खानलाही अटक केली आहे. पण आता या तपासाचा मुख्य घटक असलेले समीर वानखेडे यांच्यावर पाळत ठेवली जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

सध्या हे प्रकरण संपुर्ण देशभर चांगलंच गाजत असून त्यामुळे समीर वानखेडे यांनी केलेल्या कारवाईवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित करत ही कारवाई बनावट असल्याचं म्हटलं होतं. तसेच या कारवाईतून भाजप नेत्यांच्या नातेवाईकांना सोडण्यात आलं, असाही आरोप करण्यात आला.

नवाब मलिकांनी केलेल्या आरोपांनंतर आता एनसीबीचे मुंबई झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी आपल्यावर पाळत ठेवली जात असल्याचा दावा करत मुंबई पोलिसात यासंदर्भात सीसीटीव्ही फुटेजसह तक्रार दाखल केली आहे. 2015 पासून समीर वानखेडे हे आपल्या आईचा अंत्यविधी केला त्या ठिकाणी जात असतात. परंतू, सोमवारी त्यांच्यामागे 2 जण पाठलाग करत असल्आचं त्यांच्या लक्षात आलं.

यावेळी त्यांनी या ठिकाणचं सीसीटीव्ही फुटेज मिळवून आपल्यावर पाळत ठेवली जात असल्याची तक्रार करत या पाळत ठेवणाऱ्यांपैकी एक व्यक्ती ही मुंबई पोलिस दलात महत्त्वाच्या पदावर कार्यरत असल्याचंही म्हटलं आहे. तसेच सखोल चौकशीची मागणीही त्यांनी केली आहे. पण अद्याप त्यांचा पाठलाग करणारी ती व्यक्ती नेमकी कोण? हे स्पष्ट झालेलं नाही.

थोडक्यात बातम्या

आमदार रवी राणांच्या अडचणी वाढल्या; आमदारकी धोक्यात?

‘मुंबई क्रुझ प्रकरण पुर्णपणे खोटं, शाहरूख खान त्यांच्या निशाण्यावर’; शत्रुघ्न सिन्हा संतापले

“शिवसेनेच्या दळिद्री पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्याची सफरचंद चोरून खालली”

विराटचं स्वप्न भंगलं! रोमांचक सामन्यात कोलकाताचा बंगळुरूवर दणदणीत विजय

वाह छेत्री वाह! सुनिल छेत्रीने केली महान फुटबॉलपटू पेलेच्या व्रिकमाची बरोबरी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More