बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सुशांतच्या आत्महत्येनंतर मुंबई पोलिसांचा महत्त्वाचा खुलासा

मुंबई |   अभिनेता सुशांत सिंग राजपूतने मुंबईतल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. अवघ्या 34 व्या वर्षी तो हे जग सोडून परतीच्या प्रवासाला निघून गेला आहे. सुशांतच्या आत्महत्येने कला क्षेत्रात एकच खळबळ माजली आहे. पोलिसांनी सुशांतच्या घरी जात, तसंच त्याच्या खोलीची पाहणी करत महत्त्वाचा खुलासा केला आहे.

पोलिसांनी सुशांतचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता खोलीत कोणतीही सुसाईट नोट आढळली नाही, असं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासात सुशांतने नैराश्यातून आत्महत्या केली, असावी असा अंदाज वर्तवला आहे.

सुशांत हा गेल्या काही दिवसांपासून नैराश्याने ग्रस्त झाला होता. गेल्या अनेक दिवसांपासून तो स्पेशल डॉक्टरांकडून उपचार देखील करवून घेत होता. त्याच्या घरात त्याचे वैद्यकीय उपचाराचे अहवाल आढळून आले आहे.

सुशांत सिंग हा आघाडीचा नायक म्हणून प्रसिद्ध होता. त्याने आपल्या करिअरची सुरूवात टीव्ही सिरीअलमधून केली होती. पवित्र रिश्ता ही त्याची मालिका चांगलीच गाजली होती आणि आजही तो घराघरात याच मालिकेमुळे ओळखला जातो.

दरम्यान, चित्रपटसृष्टीतल्या अनेक दिग्गज्जांना हा धक्का पचवणं कठीण झालं आहे. सुशांतच्या जाण्याने अनेकांनी शोक व्यक्त करत त्याच्याप्रति आदरांजली व्यक्त केली आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

‘अशीच चमकत रहा, तू अशा लोकांपैकी एक…, पाहा आदित्य ठाकरेंनी दिशाला काय दिलाय रिप्लाय!

संजय राऊतांच्या राज ठाकरेंना ‘मनसे’ शुभेच्छा, म्हणाले…

महत्वाच्या बातम्या-

‘आमची कधी भेट झाली नव्हती, पण…; सुशांतच्या मृत्यूवर लता मंगेशकरांनी व्यक्त केल्या भावना

अभिनेता सुशांतसिंग राजपूतनं आत्महत्या करुन संपवलं जीवन, राहत्या घरी घेतली फाशी…!

राष्ट्रवादीचा ‘या’ माजी आमदाराचा कोरोनामुळे मृत्यू, राजकीय क्षेत्रात खळबळ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More