बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

गर्भवतीला रस्त्यातच सुरू झाल्या प्रसुतीकळा; मुंबई पोलिसांच्या गाडीतच महिलेनं दिला बाळाला जन्म

मुंबई | मुंबई पोलिसांचे अनेक किस्से ऐकायला मिळत असतात. मुंबई पोलिसांनी कोरोना संकंटातही आपलं कर्तव्य योग्य जबाबदारीने पार पाडताना दिसत असतात. अशात मुंबईच्या वरळी नाक्यावर झालेल्या घटनेनं मुंबई पोलिसांची मान आणखी उंचावली आहे.

वरळी नाका येथे मंगळवारी सायंकाळी पाचच्या सुमारास एक गरोदर महिला रस्त्याने जात असताना अचानक चक्कर येऊन पडली. रस्त्यावर असलेल्या लोकांनी तात्काळ याची माहिती पोलिसांना कळवली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांच्या दोन गाड्या त्या ठिकाणी पोहोचल्या. तिथे पोहोचल्यावर पोलिसांना ती महिला गरोदर असल्याचं कळलं आणि तिला प्रसुती कळा सुरु झाल्याचं कळलं. महिलेची प्रकृती नाजूक होती आणि तिच्या प्रसुती कळा वाढत होत्या. यातच प्रसंगावधान ओळखून पोलिसांनी नायर रुग्णालयाकडे गाडी वळवली.

रुग्णालयाला जाण्यासाठी वेळ लागत असल्यामुळे पोलिसांच्या गाडीतच प्रसुती करण्याची वेळ आली होती. क्षणाचाही विलंब न करता पोलीस उपनिरीक्षक पाटील, महिला कॉन्स्टेबल सपकाळ, एएसआय मानेसह इतर कर्मचाऱ्यांनी आणि रस्त्यावरून जात असलेली पादचारी स्थानिक महिला रहिवासी प्रिया जाधव यांनी त्या महिलेला पोलिसांच्या गाडीत ठेवलं आणि नायर रुग्णालयाच्या दिशेने रवाना झाले. गाडीमध्ये उपस्थित असलेल्या महिला कर्मचाऱ्यांनी पोलिसांच्या गाडीतच यशस्वीपणे प्रसुती करुन घेत तिचे आणि बाळाचे प्राण वाचवले.

दरम्यान, ही महिला 7 महिन्यांची गर्भवती होती. वेळेपुर्वीच तिची प्रसुती करावी लागली. मुंबई पोलिसांचं हे काम खरोखर कौतुकास्पद आहे. पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे बाळ आणि बाळंतीण दोघेही सुखरुप आहेत.

थोडक्यात बातम्या-

‘मुख्यमंत्र्यांनी जनतेच्या तोंडाला पानं पुसली’; चंद्रकांत पाटलांची ठाकरे सरकारवर टीका

“पवार साहेबांचं सरकार हाय, तुमच्या बापाच्यानं पण पडणार नाय”

रमजानसाठी सरकारकडून मार्गदर्शक सुचना जारी; वाचा काय आहेत निर्बंध

“करेक्ट कार्यक्रम हा शब्दही चोरल्यासारखा वाटतो, हा शब्द नेमका कुणाचा हे सर्वांना माहितीये”

‘ब्रेक द चेन नव्हे तर चेक द ब्रेन’; नितेश राणेंचा मुख्यमंत्र्याना टोला

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More