मुंबई पोलिसांचा राणा दांपत्याबद्दल धक्कादायक दावा, ‘ही’ माहिती समोर
मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) ‘मातोश्री’ निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसा पठण करणार असल्याची घोषणा खासदार नवनीत राणा (Navneet Rana) व आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी दिली. यानंतर राजकीय वातावरण तापलं असताना मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) राणा दांपत्याला ताब्यात घेतलं.
राणा दांपत्याने जामिन मिळवण्यासाठी न्यायालात अर्ज दाखल केला. इतर न्यायालयीन प्रकरणांमुळे सुनावणी शक्य नसल्याचं म्हणत न्यायालयाने शुक्रवारी होणारी सुनावणी शनिवारी घेऊ असं स्पष्ट केलं. मात्र, मुंबई पोलिसांनी राणा दांपत्याच्या जामिन अर्जाला जोरदार विरोध करत प्रतिज्ञापत्रादात खळबळजनक आरोप केले आहेत.
मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसा स्तोत्राचे पठण करायचे होते, असा भोळेपणाचा आव आणत राणा दांपत्याने जामिनासाठी अर्ज केला असला तरी हा प्रकार तितका साधासरळ नाही. त्यामागे महाविकास आघाडीच्या अस्तित्वालाच आव्हान देण्याचा मोठा दाव होता, असा खळबळजनक दावा मुंबई पोलिसांनी केला आहे.
दरम्यान, सत्तेपासून वंचित असलेला भाजप आणि मुख्यमंत्री ठाकरे यांचे विरोधक हे जाणीवपूर्वक सरकारविरोधी वातावरण तयार करून आघाडी सरकार उलथवून लावण्याच्या प्रयत्नात होते, असा आरोप देखील मुंबई पोलिसांकडून करण्यात आला आहे. त्यामुळे राणा दांपत्याच्या जामिन अर्जावर होणाऱ्या आजच्या सुनावणीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.
थोडक्यात बातम्या-
नवऱ्यापासून वेगळं झाल्यानंतर राखी सावंतने घेतला ‘हा’ मोठा निर्णय
…’हे’ षडयंत्र भाजपवरच उलटणार, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
अनिल देशमुखांच्या मुलासह अजित पवार पोहोचले गडकरींच्या भेटीला, राजकीय वर्तुळात खळबळ
चुकीला माफी नाही! वाहतुकीचे नियम मोडल्यानं अजित पवारांनी भरला ‘इतक्या’ हजारांचा दंड
2 मेपर्यंत उष्णतेच्या लाटेचा इशारा, वाचा हवामान विभागाचा अंदाज
Comments are closed.