मुंबई | युद्धनौका आयएनएस विक्रांतला (INS Vikrant) वाचवण्यासाठीच्या मोहिमेत भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी कोट्यवधींची फसवणूक केल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला होता. सोमय्यांनी या मोहिमेत 58 कोटी रूपये जमा केले मात्र ते राजभवनात जमा केले नसल्याचं देखील राऊत म्हणाले होते.
किरीट सोमय्या व त्यांचे पुत्र नील सोमय्या यांच्या विरोधात या प्रकरणी ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात एफआयआर (FIR) दाखल करण्यात आला. किरीट सोमय्या व नील सोमय्यांविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर ट्रॉम्बे पोलिसांनी सोमय्या पिता-पुत्रांना मोठा झटका दिला आहे.
ट्रॉम्बे पोलिसांनी किरीट सोमय्या व नील सोमय्या यांना समन्स बजावले आहेत. पोलिसांनी सोमय्या पिता-पुत्रांना शनिवारी सकाळी 11 वाजता चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. पोलीसांनी ऐकीव माहितीच्या आधारावर ही एफआयआर दाखल केल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे या प्रकरणाला काय वळण लागणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
दरम्यान, एका नागरिकाने वृत्तपत्रातील बातमीच्या आधारे ही तक्रार नोंदवली. यात कोणताही पुरावा नाही. मुंबई पोलिसांनी माझ्याविरोधात दाखल केलेला हा एफआयआर हस्यास्पद आहे, अशी प्रतिक्रिया किरीट सोमय्या यांनी दिली आहे.
थोडक्यात बातम्या-
मुंबईत पेट्रोल-डिझेलचा उच्चांक, वाचा ताजे दर
शरद पवारांवरील हल्ल्यानंतर मुख्यमंत्री आक्रमक, दिले ‘हे’ महत्त्वाचे आदेश
“शरद पवार साहेब आता तरी संन्यास घ्या अन् गप्प घरी बसा”
‘सिल्वर ओक’ हल्ल्याप्रकरणी 107 जणांवर गुन्हा दाखल; गुणरत्न सदावर्ते पोलिसांच्या ताब्यात
सिल्वर ओकवरील घटनेनंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
Comments are closed.