Top News मनोरंजन मुंबई

कंगणा राणावत आणि रंगोलीला मुंबई पोलिसांकडून समन्स; 10 नोव्हेंबरला हजर रहावं लागणार

मुंबई | मुंबई पोलिसांनी अभिनेत्री कंगणा राणावत आणि तिची बहिण रंगोलीला समन्स बजावलाय. यामुळे कंगणा आणि रंगोली या दोघींना येत्या 10 नोव्हेंबर रोजी हजर राहण्यास सांगण्यात आलंय.

कंगणा राणावत आणि तिची बहीण रंगोली या दोघींनी सोशल मीडिया काही पोस्ट केल्या होत्या. या पोस्टमुळे समाजात दुहीचं वातावरण निर्माण झालाय असा आरोप त्यांच्यावर आहे. याप्रकरणी त्यांनी उत्तर द्यायचं असून त्यांना समन्स बजावण्यात आलाय.

कंगणा आणि तिच्या बहिणीने केलेल्या पोस्टमुळे हिंदू आणि मुस्लीम समाजात कलाकारांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप करण्यात आला होता. यासंदर्भात वांद्रे कोर्टात याचिका दाखलही करण्यात आली.

याचिका दाखल करताना कोर्टात कंगणाने केलेले ट्विट्स सादर करण्यात आले. या दोघींविरोधात ऑक्टोबर महिन्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला. आता वांद्रे कोर्टाने कंगणा आणि तिच्या बहिणीला समन्स बजावलाय.

महत्वाच्या बातम्या-

“4 हजार कोटी बरबाद करण्याचा शौक असेल तर मंत्र्यांनी स्वत:च्या खिशातले उडवावे”

“…तर भाजपचे अनेक नेते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील”

…हे तर महाराष्ट्राची कोंडी करण्याचं षडयंत्र- किशोरी पेडणेकर

भयंकर महागाई ही भाजपकडून जनतेला दिवाळीची भेट- प्रियांका गांधी

‘राज्यात हजारो रोजगार उपलब्ध होणार’; ठाकरे सरकारचा 15 कंपन्यांसोबत सामंजस्य करार

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या