बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात आता मुंबई पोलिसांचीही उडी! करणार ‘हा’ तपास

मुंबई | नवाब मलिक विरूद्ध समीर वानखेडे वाद आता विकोपाला गेला आहे. आर्यन खान ड्रग्ज प्रकरण समोर आल्यापासूनच अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर आरोपाच्या फैरी झाडायला सुरूवात केल्या. नवाब मलिकांनी ट्विट्स आणि पत्रकार परिषदेच्या माध्यमातून वानखेडेंविरोधात बरेच गौप्यस्फोट करत त्यांना घेरलं आहे.

त्यात पंच प्रभाकर साईलने समीर वानखेडेंवर लाचखोरीचा आरोप केल्याने त्यांच्या अडचणीत वाढ झाली. पोलिसांकडून संरक्षण मागितल्यावर या खंडणीच्या आरोपाप्रकरणी साईलने मुंबई पोलिसांकडे जबाब नोंदवला आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी कोणताही गुन्हा दाखल केला नसला तरी या प्रकरणाच्या तपासाची जबाबदारी एसीपी दर्जाच्या अधिकाऱ्याकडे सोपवण्यात आली असल्याची माहिती आहे.

मलिक यांनी केलेल्या आरोपात कसलेही तथ्य नसल्याचं वानखेडे यांच्याकडून सांगण्यात येत आहे. पण या आरोप प्रत्यारोपाच्या मालिकेला आता सामान्य नागरिकही वैतागले आहेत. नवाब मलिक आणि समीर वानखेडेंच्या विरोधात मुंबईतील वेगवेगळ्या ठाण्यात डझनभरच्या आसपास लेखी तक्रारी आल्या आहेत. या तक्रारी संदर्भातही गुन्हे दाखल झाले नसले तरी याचाही तपास आता होणार आहे.

या चौकशीसाठी विशेष पथक देखील नेमण्यात आलं आहे. ज्याचंं मार्गदर्शन सहाय्यक पोलीस आयुक्त मिलिंद खेतले करणार आहेत. तर या पथकात अप्पर पोलीस आयुक्त दिलीप सावंत यांची पर्यवेक्षक म्हणून तर पोलीस उपायुक्त हेमराजसिंग राजपूत यांची सहपर्यवेक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. या तक्रारींचा तपास पोलीस निरीक्षक अजय सावंत, सहाय्यक निरीक्षक श्रीकांत कारकर आणि उपनिरीक्षक प्रकाश गवळी यांचं पथक करणार आहे.

थोडक्यात बातम्या-

“एका महिलेशी कसं बोलावं हे पवारसाहेबांनी शिकवलं नाही का?”

“पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढले की मोदींची दाढी एक इंच वाढते”

“…तोपर्यंत ड्रग्स प्रकरणाची चौकशी समीर वानखेडेचं करतील”

“ही निवडणूक केवळ देवेंद्र फडणवीसांचं मुंगेरीलालचं स्वप्न”

“आता खरे सुत्रधार बाहेर येतील, ही तर मोदी सरकारला मोठी चपराकच”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More