हिरो होगा फिल्मों में!!! मुंबई पोलिसांनी वरुण धवनला फटकारलं

मुंबई | चालत्या कारमधून शेजारच्या रिक्षातील तरुणीला सेल्फी देणं अभिनेता वरुण धवनच्या चांगलंच अंगाशी आलंय. मुंबई पोलिसांनी त्याला ई-चलन पाठवलंय. 

एका प्रसिद्ध वृत्तपत्रात वरुण धवनचा हा फोटो छापून आला होता. ट्विटरवर हा फोटो पोस्ट करत मुंबई पोलिसांनी वरुन धवनला चांगलंच फटकारलं आहे. 

असे स्टंट फक्त रुपेरी पडद्यावर काम करतात मुंबईच्या रस्त्यावर नव्हे. तुझ्याकडून या अपेक्षा नाहीत काळजी घे. ई-चलन तुझ्या घराच्या मार्गावर आहे, असं ट्विट मुंबई पोलिसांनी वरुण धवनला केलंय.