बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘मुंबई पुण्याला तिसऱ्या लाटेचा धोका नाही’; तज्ज्ञांनी सांगितलं ‘हे’ मोठं कारण

मुंबई | कोरोनाच्या दोन लाटांनी भारतात असंख्य लोकांचे प्राण घेतले. त्यामुळे अनेक राज्यांना लाॅकडाऊन करावं लागलं. पहिल्या लाटेत शहरी भागांना कोरोनाने झोडपलं. त्यानंतर दुसऱ्या लाटेत शहरी तसेच ग्रामीण भागात कोरोनाने थैमान घातलं. आता सप्टेंबर मध्ये कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या लाटेचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागाला बसणार असल्यानं गावं कोरोना मुक्त करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

तज्ज्ञांच्या मते जागतिक स्तरावर कोरोनामुक्त झाल्यानंतर पुन्हा कोरोना होण्याचं प्रमाण फक्त एक टक्के आहे. मुंबई आणि पुण्यासारख्या शहरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं थैमान घातलं होतं. त्यामुळे या शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव इतका होता की तिसरी लाट येण्याची शक्यता कमीच आहे, असं एनटीएजीआयचे अध्यक्ष डॉ. एन. के अरोरा यांनी सांगितलं आहे.

देशात सध्या असलेल्या कोरोना स्ट्रेनमुळे सध्या धुमाकूळ घातला आहे. या सर्वांमध्ये अँटीबॉडी तयार झाल्या आहेत. त्यामुळे तिसऱ्या लाटेचा धोका कमी जाणवत आहे. जोपर्यंत कोरोना स्ट्रेनमध्ये कोणताही मोठा बदल होत नाही, अथवा कोरोनाचा नवीन स्ट्रेन येत नाही, तोपर्यंत कोरोनाची तिसरी येण्याची शक्यता नाही, असंही डॉ. जयप्रकाश मुलियाल यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, पुणे आणि मुंबई सोबत देशभरात दिल्ली, चेन्नई, बंगळुरू,कोलकाता यांच्यासारख्या शहरात देखील कोरोनाची तिसरी लाट कमी धोकादायक असणार आहे. आधी इंडियन स्ट्रेन म्हणून ओळखला जाणारा आणि आताचा डेल्टा स्ट्रेन सर्वात धोकादायक असल्याचं सांगितलं जात आहे. या स्ट्रेनचे रुग्ण शहरी भागात जास्त सापडल्यानं आता या ठिकाणी कोरोना धोका कमी असल्याचं सांगण्यात आलंय.

थोडक्यात बातम्या-

ठाकरे सरकारची डोकेदुखी वाढली; मराठा समाजापाठोपाठ आता ओबीसी समाजाचा राज्यव्यापी मोर्चा

वेल डन छेत्री! दिग्गज मेस्सीला मागे टाकत भारतीय सुनिल छेत्रीची दुसऱ्या स्थानी झेप

मंडपात नवऱ्याला बघताच नवरीने केलं असं काही की…, पाहा व्हिडीओ

कोरोनामुळे ‘या’ महापालिकेतील तब्बल 19 कर्मचाऱ्यांचा मृत्यू

 हाय अलर्ट! ‘या’ जिल्ह्याला हवामान विभागाचा अतिवृष्टीचा इशारा; पुढचे 2 दिवस धोक्याचे

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More