बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मुंबई-पुणेकरांना पाऊस झोडणार, ‘या’ 9 जिल्ह्यांनाही रेड अलर्ट!

मुंबई | गेल्या काही दिवसांपासुन महाराष्ट्रात पावसाने दांडी मारली असल्याचं चित्र पाहायला मिळत असताना आता पुन्हा एकदा मान्सुन सक्रिय होत असल्याचं पाहायला मिळत आहे. शनिवारपासुन मुंबईतही पावसाने चांगलाच जोर धरला आहे.  त्यातच मुंबईत झालेल्या दुर्घटनेत गेल्या 24 तासात तब्बल 33 नागरिकांना आपला जिव गमवावा लागला आहे.

सध्या मान्सुन पुन्हा एकदा जोरदार बॅटींग करत असताना मुंबईसह महाराष्ट्रातील  9 जिल्ह्यांना भारतीय हवामान विभागाने रेड अलर्ट दिला आहे. तसेच नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई, पुणे, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर व रायगड या जिल्ह्यांना आज हवामान विभागाकडून रेड अलर्ट देण्यात आला आहे.

भारतीय हवामान विभागाकडुन या 9 जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच पावसाने हजेरी लावायला सुरुवात केली की, आता अनेक पर्यटनस्थळे पर्यटकांनी गजबजलेली दिसून येत असतानाच पुणे जिल्ह्यातील सर्व पर्यटनस्थळांवर प्रशासनाकडून कलम 144 प्रशासनाकडून लागू करण्यात आले आहे.

उद्यापासुन सलग 4 दिवस महाराष्ट्रातील कोकण, मध्य महाराष्ट्रासह पश्चिम महाराष्ट्रात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तसेच येत्या 4 दिवसात पावसाने संपुर्ण महाराष्ट्र झोडपुन निघणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. त्यामुळे नागरिकांनीही घराबाहेर पडताना योग्य ती खबरदारी घेणं गरजेचं आहे.

थोडक्यात बातम्या – 

एकनाथ खडसे यांना ईडीचा दणका; अटकेत असलेल्या जावयाबाबत ‘ही’ महत्वाची माहिती आली समोर

येत्या निवडणूकीमध्ये एखादा उमेदवार निवडून नाही आला तरी चालेल, पण…, – देवेंद्र फडणवीस

मला वाटतं यापेक्षा दुसरा मोठा जोक असु शकत नाही- अमोल मिटकरी

“ठाकरे सरकारमध्ये नेते कमी आणि बोलके पोपट जास्त आहेत”

“केवळ याच जन्मात नाही तर पुढील जन्मातही पंकजा मुंडे भाजपमध्येच राहतील”

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More