मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, मध्य रेल्वेच्या वेळापत्रकात महत्त्वाचे बदल

Mumbai l मुंबईकरांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागामार्फत उद्या म्हणजेच 16 जूनला विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करत उपनगरीय विभागांवर मेगा ब्लॉक घेण्यात येणार असल्याची महत्वाची बातमी समोर आली आहे. या ब्लॉक माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान घेण्यात येणार आहे.

रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी :

उद्या मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात मेगा ब्लॉक सकाळी 11:05 ते दुपारी 3:05 वाजेपर्यंत माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान घेण्यात येणार आहे. त्यामुळे अप आणि डाऊन जलद मार्ग सीएसएमटी मुंबई येथून सकाळी 10:25 ते दुपारी 2:45 पर्यंत सुटणाऱ्या डाऊन जलद मार्गावरील सेवा माटुंगा येथे डाऊन धिम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत. माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान त्यांच्या संबंधित नियोजित थांब्यांवर थांबतील आणि निर्धारित वेळेच्या 15 मिनिटे उशिरा पोहोचणार असल्याची नोंद प्रवासानी घ्यावी. तसेच ठाण्यापलीकडे जलद गाड्या मुलुंड येथे डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत.

याशिवाय सकाळी 10:50 ते दुपारी 3:00 वाजेपर्यंत ठाणे येथून सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील सेवा मुलुंड येथे अप धिम्या मार्गावर वळवल्या जाणार आहेत, तर मुलुंड आणि माटुंगा दरम्यान त्यांच्या संबंधित नियोजित थांब्यावर थांबणार आहे. तसेच पुढे माटुंगा स्थानकावर अप जलद मार्गावर पुन्हा वळवण्यात येणार आहेत आणि 15 मिनिटांनी गंतव्यस्थानावर पोहचणार आहेत.

Mumbai l असे असेल लोकल ट्रेनचे वेळापत्रक :

सर्वत्र महत्वाचं म्हणजे ब्लॉकपूर्वी शेवटची लोकल बदलापूर लोकल सीएसएमटी येथून सकाळी 10:20 मिनिटांनी सुटणार आहे. तर ब्लॉकनंतर पहिली लोकल बदलापूर लोकल सीएसएमटी येथून दुपारी 3:3 वाजता सुटणार असल्याची माहिती आहे.

याशिवाय ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल अंबरनाथ लोकल असणार आहे. जी सकाळी 11:10 मिनिटांनी सीएसएमटी येथे पोहोचेल. ब्लॉकनंतर पहिली लोकल कसारा लोकल सीएसएमटी येथे दुपारी 3:59 मिनिटांनी पोहोचेल. याशिवाय अप आणि डाऊन हार्बर मार्गावर कुर्ला आणि वाशी स्थानकांदरम्यान सकाळी 11:10 ते दुपारी 4:10 पर्यंत असणार आहे.

पनवेल/बेलापूर/वाशीसाठी जाणारी रेल्वे सकाळी 10:34 ते दुपारी 3:36 पर्यंत सीएसएमटी मुंबईकडे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा आणि सकाळी 10:16 ते दुपारी 3:47 वाजेपर्यंत सीएसएमटी मुंबईकडे सुटणाऱ्या पनवेल/बेलापूर/वाशीकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द असणार आहेत.

याशिवाय ब्लॉक कालावधीत सीएसएमटी मुंबई-कुर्ला आणि पनवेल-वाशी या भागांवर विशेष उपनगरीय गाड्या धावणार आहेत. तसेच ब्लॉक कालावधीत हार्बर मार्गावरील प्रवाशांना ठाणे-वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान सकाळी 10:00 ते संध्याकाळी 6:00 वाजेपर्यंत प्रवास करण्याची परवानगी आहे.

News Title – Mumbai Railway Trains Updates

महत्त्वाच्या बातम्या

पावसाळी अधिवेशनाची तारीख ठरली! कोणते मुद्दे गाजणार

आज शनीदेव या राशींच्या आयुष्यात बदल घडवणार; मिळणार गोड बातमी

लंके-मारणेच्या भेटीवरून राजकारण तापलं; रोहित पवारांनी मागितली माफी

शिंदे सरकारची मोठी घोषणा, वारीतील प्रत्येक दिंडीला मिळणार ‘इतके’ हजार रूपये

‘इतका निस्वार्थी भावना असणारा’; तेजस्विनी पंडितची राज ठाकरेंसाठी खास पोस्ट