Monsoon Updates l राज्यात अनेक भागात मुसळधार पाऊस हजेरी लावत आहे. अशातच आता मुंबई आणि मुंबई उपनगरात मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. यामुळे मुंबईच्या अनेक भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे. मुंबई महानगर येथे काल मध्यरात्रीनंतर 1 वाजेपासून ते आज सकाळी तब्बल 7 वाजेपर्यंत पाऊस कोसळला आहे.
मुंबई महानगरातील शाळांना आज सुट्टी :
मुंबईत या सहा तासांच्या कालावधीत विविध ठिकाणी असा मिळून तब्बल 300 मिलिमीटर पेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे उंबईतील विविध भागांमध्ये जोरदार पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे तर उपनगरीय रेल्वे सेवा देखील विस्कळीत झाल्याची माहिती समोर आली आहे.
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, आज दिवसभर जोरदार पाऊस होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. शालेय विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून मुंबई महानगर येथील सर्व महानगरपालिका, शासकीय आणि खासगी माध्यमांच्या शाळांना तसेच महाविद्यालयांच्या पहिल्या सत्रासाठी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
Monsoon Updates l दुसऱ्या सत्रातील शाळांचा निर्णय अद्याप बाकी :
वाढत्या पावसाच्या पार्श्वभूमीवर तेथील परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील सत्रांसाठीचा निर्णय जाहीर करण्यात येणार आहे. तसेच पहिल्या (सकाळच्या) सत्रातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसेच पावसाचा आढावा घेऊन दुसऱ्या सत्रातील शाळा महाविद्यालयांना सुट्टी द्यायची की नाही या संदर्भात मात्र अद्याप निर्णय घेतला नाही.
मात्र काही वेळातच हा निर्णय घेण्यात येणार आहे, असं मुंबई महानगरपालिका प्रशासनकडून सांगण्यात आलं आहे. याशिवाय पावसाच्या कारणास्तव नोकरदारांना देखील घराबाहेर न पडण्याचं आवाहन देखील करण्यात येत आहे.
News Title : Mumbai Rain School College Updates
महत्वाच्या बातम्या-
दुःखद! ऑस्कर विजेत्यानं घेतला जगाचा निरोप
पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचे! ‘या’ भागांना ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी
पावसाळ्यात सर्दी-खोकल्यापासून त्रस्त आहात?, ‘हे’ आयुर्वेदिक उपाय देतील आराम
16 वर्षांपुर्वीच्या ‘त्या’ खटल्याप्रकरणी राज ठाकरेंची निर्दोष मुक्तता!
“ज्याच्या घरातली स्त्री दुःखी, त्याची बरबादी नक्की”; ‘धर्मवीर-2’चा टीझर पाहिलात का?