Mumbai Rain | हवामान विभागाने मुंबईसाठी महत्वाचा इशारा दिला आहे. सध्या मुंबई शहर आणि उपनगरात मध्यम स्वरुपाचा पाऊस (Mumbai Rain) सुरु आहे. मात्र, सायंकाळनंतर येथे अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मध्य रात्रीपासून मुंबईत पाऊस सुरु असून आज मुंबईला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
तसेच पुढील तीन ते चार तास मुंबईमध्ये पावसाची संततधार कायम राहणार असल्याची माहिती देखील हवामान विभागानं दिली आहे. त्यामुळे नागरिकांनी अलर्ट राहावं, असं आवाहन करण्यात आलंय.
मुंबईसाठी पुढील 3 ते 4 तास महत्वाचे
आज 18 जुलैरोजी मुंबईत कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 29 सेल्सिअस आणि 25 सेल्सिअसच्या आसपास असणार आहे. तसेच मुंबईत पुढील 3 ते 4 तास पावसाची संततधार (Mumbai Rain) कायम राहणार आहे.
मध्यरात्रीपासून पावसाने मुंबईत पुन्हा हजेरी लावली आहे. त्यामुळे सखल भागात पाणी साचत आहे. सकाळी साडेपाच वाजेपर्यंत दक्षिण मुंबईत 51.8 मिमी पावसाची नोंद झाली आहे तर पश्चिम उपनगरात 27 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
राज्यातील ‘या’ भागांनाही जोरदार पावसाचा इशारा
दुसरीकडे, राज्यातील इतर भागात देखील पावसाचा (Mumbai Rain) जोर वाढला आहे. राज्यातील कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
तसेच मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड आणि पुणे जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. विदर्भातील देखील अनेक भागांना पावसाचा इशारा देण्यात आलाय. त्यामुळे संपूर्ण विदर्भात आजही पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
News Title – Mumbai Rain update 18 july
महत्वाच्या बातम्या-
पावसाळ्यात डेंग्यूचा धोका अधिक, पालकांनो आपल्या मुलांचं ‘असं’ करा संरक्षण!
शिंदे, फडणवीस, ठाकरे नव्हे तर राज्यातील मतदारांना भाजपचा ‘हा’ नेता मुख्यमंत्री पाहायचाय!
पुढील 5 दिवस ‘या’ भागात जोरदार पाऊस बरसणार; ऑरेंज अलर्ट जारी
अजित पवारांना पुन्हा पक्षात घेणार का?, शरद पवार म्हणाले…
निलेश लंकेंचं टेंशन वाढणार?, सुजय विखेंची ‘ती’ मागणी निवडणूक आयोगाकडून मान्य