मुंबईकरांनो जरा बचके! हवामान खात्याचा हायअलर्ट, पुढील 24 तास..

Mumbai Rain | मुंबई पावसामुळे तुडुंब झाली आहे. मुंबईत कालपासून मुसळधार पावसाने थैमान घातलं आहे.बऱ्याच ठिकाणी वाहतूक ठप्प झाली आहे. रस्त्यांना नदीचे स्वरूप आल्याचे चित्र यावेळी दिसून आले. रात्रभर पाऊस पडल्यानंतर आज सकाळी पावसाने जरा विश्रांती घेतली आहे.

यामुळे जनजीवन पूर्वपदावर येण्यास मदत झाली. अशात हवामान विभागाने महत्वाची अपडेट दिली आहे. मुंबईत काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. विशेष म्हणजे मुंबईसाठी (Mumbai Rain) पुढचे 24 तास जास्त महत्त्वाचे असणार आहेत.

पुढील 24 तास मुंबईसाठी महत्वाचे

मुंबईत रात्रभरात तब्बल 300 मिमी पाऊस पडला आहे. त्यामुळे रेल्वे वाहतुकीवर त्याचा मोठा परिणाम पडला. सध्या हळूहळू रेल्वे वाहतूक सुरळीत होत आहे. मध्य आणि हार्बर रेल्वे सेवा आता सुरु झाली आहे. मात्र, पुन्हा मुंबईत पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज (Mumbai Rain) आहे.

मुंबईतील पावसाबद्दल पुणे हवामान विभागाचे प्रमुख डॉ. के. एस. होसाळीकर यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. मुंबईतील पावसाने सध्या उघडीप घेतली आहे. पुढील 24 तासात मुंबईत ढगाळ वातावरण आणि काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. मुंबईला सध्या येलो अलर्ट जारी केला आहे, अशी माहिती होसाळीकर यांनी दिली आहे.

एकनाथ शिंदे यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षाला भेट दिली. मुसळधार पावसामुळे राज्यात आणि मुंबईत निर्माण झालेल्या पूर परिस्थिती आणि एकंदर अतिवृष्टीचा मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला. तसेच गरज असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे. तसेच मुंबई मनपा, पोलीस प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणेला सहकार्य करावे, असे आवाहन देखील एकनाथ शिंदे यांनी केले आहे.

300 मिमी पडल्यानंतर मुंबईची अवस्था इतकी वाईट (Mumbai Rain) झालीये. यावरून राजकारणही प्रचंड तापलं आहे. विरोधक आता हा मुद्दा लावून धरत आहेत. “मुख्यमंत्र्यांसाठी ग्रीन कार्पेट, मुंबईकरांसाठी जिकडे तिकडे चिखल! ग्रीन कार्पेट टाकून नाले सफाई कामाची पाहणी करणाऱ्या मुख्यमंत्र्यांना पहिल्याच पावसाने त्यांच्या कामाची पावती दिली आहे. केंद्रापासून मुंबई महानगरपालिका पर्यंत यांचीच सत्ता आहे. तरी सुद्धा पहिल्याच पावसात मुंबई यांनी तुंबून दाखवली.”, अशी टीका कॉँग्रेस नेते तथा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी केली आहे.

News Title –  Mumbai Rain update 8 july 

महत्वाच्या बातम्या-

रायगडावर पावसाचं रौद्ररुप, पर्यटकांची उडाली तारांबळ; पाहा अंगावर काटा आणणारा VIDEO

“रिचार्जचे पैसे जस्टिन बिबरच्या खिशात”; अनंत अंबानीच्या लग्नसोहळ्यावर प्रसिद्ध अभिनेत्रीची पोस्ट

“धनदांडग्याची मुले असो किंवा राजकारण्यांची..”; ‘हिट अँड रन’ प्रकरणी मुख्यमंत्री शिंदेंचं मोठं वक्तव्य

मुंबईच्या पावसाचा मंत्र्यांनाही फटका; ‘या’ नेत्यांनी रेल्वे रूळावरून केला चालत प्रवास

“..तेव्हा तुमचे बाप-दादा इंग्रजांचे तळवे चाटत होते”; जावेद अख्तर भडकले