Mumbai Rain Update | पहिल्या पावसात मुंबईची तुंंबई हे समीकरण नवीन नाही. कालपासून मुंबई, तसेच इतर उपनगरांमध्ये सखल भागात पाणी साचलं आहे. यामुळे वाहतुकीला मोठी समस्या निर्माण होताना दिसत आहे. पुरजन्य परिस्थिती ओढावली असल्याचं चित्र निर्माण झाल्याने काही शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. मुंबईच्या काही शाळांच्या भोवताली पाणी साचलं आहे. या मुसळधार पावसाने नको नको केलं आहे. (Mumbai Rain Update)
मुंबई शहरात 300 मिमी पावसाची नोंद
रात्रीपासून ते सकाळपर्यंत मुंबई शहरात 300 मिमी पावसाची नोंद झाली आहे. मुंबईच्या रेल्वेरूळावरही पाणी साचलं आहे. मुंबईची लाईफलाईन असलेली लोकलही विस्कळीत झाली आहे. रविवारी रात्रीपासून ते आज (सोमवार) दिवसभर मुसळधार पावसाची शक्यता आहे. शाळकरी मुलांची गैरसोय टाळली जावी म्हणून सकाळच्या सत्रात सुट्टी दिली जाणार आहे. (Mumbai Rain Update)
सध्या पावसाचा आढावा घेतल्यानंतर दुपारच्या सत्रातील शाळा तसेच कॉलेजेसला सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मात्र सकाळपासून पाण्याचा निचरा होत नसल्याने आसपासच्या परिसरात नागरिक त्रस्त झाले आहेत.
मुंबईतील कोणत्या भागात किती पाणी साचलं?
मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये 8 जुलै 2024 रोजी मध्यरात्री 1 वाजेपासून सकाळी 7 वाजेदरम्यान सर्वाधिक पाऊस कोसळलेली ठिकाणे आणि पावसाचे प्रमाण-
एमसीएमसीआर पवई (314.6मिमी)
वीर सावरकर मार्ग महानगरपालिका शाळा (315.6मिमी)
मालपा डोंगरी महानगरपालिका शाळा (292.2मिमी)
आरे वसाहत महानगरपालिका शाळा (259.0मिमी)
चकाला महानगरपालिका शाळा (278.2मिमी)
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महानगरपालिका शाळा (255.0 मिमी)
नारीयलवाडी शाळा (241.6मिमी)
प्रतीक्षानगर महानगरपालिका शाळा (220.2 मिमी)
लालबहादूर शास्त्री मार्ग महानगरपालिका शाळा (189.0 मिमी)
रावळी कॅम्प (173.3)
शनिवारपासून मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार (Mumbai Rain Update) पावसाने नको नको केलं. मुंबईसह उपनगरांमध्ये पावसाने थैमान घातलं आहे. तसेच कोकण, ठाणे, पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाने धुमाकूळ घातला आहे. शहरात पावसाची संततधारा सुरू आहे. पावसामुळे तांत्रिक बिघाड झाल्याने लोकसेवेवर त्याचा परिणाम झाला.
पावसामुळे मुंबई शहरात सखल भागात पाणीच पाणी साठलं आहे. यामुळे वाहतुक कोंडी निर्माण झाली आहे. तर मुंबईच्या एलबीएस रोडवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. पाण्याचा निचरा न झाल्याने पाण्याच्या लांबच लांब रांगा एलबीएस मार्गावर लागल्या आहेत. (Mumbai Rain Update)
News Title – Mumbai Rain Update Heavy Rain Marathi News
महत्त्वाच्या बातम्या
ब्रेकिंग! पुण्यात भरधाव वेगाने 2 पोलिसांना चिरडलं; एकाच मृत्यू तर…
आज राज्यात कसं असणार हवामान? ‘या’ भागाला यलो अलर्ट
या राशीच्या व्यक्तींनी नात्यात दुरावा येणार नाही याची काळजी घ्यावी
पावसाच्या पार्श्वभूमीवर ‘या’ भागातील सर्व शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर