बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सचिन वाझेंच्या अडचणीत वाढ; तीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळले!

मुंबई | पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना 13 तासांच्या चौकशीनंतर राष्ट्रीय तपास यंत्रणेने बेड्या ठोकल्या होत्या. या प्रकरणात ठाणे जिल्हा सत्र न्यायालयात त्यांनी अंतरिम जामीन अर्जही दाखल केला. परंतु या प्रकरणाची सुनावणी 19 मार्चला होणार होती. तसेच सचिन वाझे यांनी मुंबई सत्र न्यायालयात राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या कार्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत आणि झालेली अटक ही बेकायदेशीर असल्याचा दावा करून एक याचिका दाखल केली होती.

मुंबई सत्र न्यायालयाने सचिन वाझे यांनी केलेले सर्व आरोप अमान्य ठरवले आहेत. त्यामुळे सचिन वाझे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. या प्रकरणात महाविकास आघाडी सरकारवर विरोधी पक्षाने ताशेरे ओढले होते.

सचिन वाझे यांचे एकूण तीन अर्ज आतापर्यंत न्यायालयाने फेटाळून लावले असून फक्त त्यांच्या वकिलांना सचिन वाझे यांना काही नियम व अटिंसह भेटण्याची मुभा देण्यात आली आहे. तसेच चौकशी दरम्यान वकिलांना सचिन वाझे यांच्याबरोबर राहण्याची परवानगी न्यायालयाने दिली आहे.

अंबानींच्या घरासमोर स्फोटकांनी भरलेली गाडी सापडल्यानंतर सुरु असलेल्या तपासात अनेक गोष्टी उघडकीस येत आहेत. राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे या सर्व गोष्टींचा तपास सोपवल्यानं संबंधित प्रकरणाचा छडा लवकरच लागेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

थोडक्यात बातम्या – 

अंबानींच्या घरासमोर पीपीई किट घातलेली ती व्यक्ती सचिन वाझे?; ‘फॉरेन्सिक पोडियाट्री’द्वारे होणार तपास!

‘तो येऊन जबाब देऊन गेला, पण महाविकास आघाडी सरकारने काय केलं?’; फडणवीसांचा सरकारवर घणाघात!

‘…पण एका मंत्र्याची विकेट पडणार’; ‘या’ भाजप नेत्याचं मोठं विधान!

बुमराहला शुभेच्छा देणं मयंक अग्रवालला पडलं महागात, वाचा नेमकं काय झालं…

पेस्टकंट्रोल करणं कुटुंबाला पडलं महागात; पालशेतकर कुटुंबावर दु:खाचा डोंगर!

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More