बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मुंबईत सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; दोन अभिनेत्रींचं नाव आल्यानं सिनेसृष्टीत खळबळ

मुंबई | ठाण्यातील एका खाजगी सोसायटीत हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. ठाणे क्राईम ब्रांचने ही कारवाई केली. या कारवाईमध्ये बॉलिवूडशी संबंधित दोन अभिनेत्रींना अटक करण्यात आली आहे. दोन अभिनेत्रींचा समावेश असल्याने सिनेसृष्टीत खळबळ उडाली आहे.

ठाण्यातील एका सोसायटीमध्ये सेक्स रॅकेट चालू होतं. याबाबची माहिती ठाणे क्राईम ब्रांचच्या अधिकाऱ्यांना मिळाली. त्यानंतर त्यांनी याची खात्री करत पोलिसांनी सोसायटीमध्ये धाड टाकली आणि त्यावेळी त्यांनी दोन अभिनेत्रींसह 3 एजंटना अटक केली. ठाणे पोलिसांच्या क्राईम ब्रांच युनिट 1ने ही कारवाई केली आहे.

दोन्ही अभिनेत्री असून वेश्या व्यवसायाकरता या दोन्ही अभिनेत्री लाखो रुपये घ्यायच्या अशी माहिती ठाणे पोलिसांनी दिली. कोरोनामुळे चित्रीकरण बंद असल्यामुळे दोन्ही अभिनेत्री या व्यवसायाकडे वळल्या असल्याचं पोेलीस तपासात समोर आल्याची माहिती आहे.

दरम्यान, या सेक्स रॅकेटमध्ये अनेक अभिनेत्रींचा समावेश असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. या कारवाईमध्ये ठाणे क्राईम ब्रांच अटक करण्यात आलेल्या आरोपींची कसून चौकशी करत आहेत.

थोडक्यात बातम्या- 

आनंदाची बातमी! पुण्याची वाटचाल कोरोनामुक्तीकडे, वाचा आजची दिलासादायक आकडेवारी

सकारात्मक बातमी! जन्मताच आईचं छत्र हरपलेल्या नवजात बालकाने 19 दिवसात केली कोरोनावर मात

“मराठा समाजाला आरक्षण द्यावं, शरद असं पवारांना कधीच वाटलं नाही”

कोरोनाने 6 वर्षीय मुलगा दगावल्याने संतापलेल्या नातेवाईकांनी डॉक्टरवर केला जीवघेणा हल्ला

‘पंतप्रधान मोदींना मारण्याच्या कटात मला गोवण्याचा प्रयत्न होता’; राज्यातील ‘या’ पक्षाच्या पक्षप्रमुखांचा खळबळजनक दावा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More