Top News महाराष्ट्र मुंबई

मुंबईत सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; ‘या’ अभिनेत्रीचं नाव आल्यानं सिनेसृष्टीत खळबळ

मुंबई | मुंबई पोलिसांच्या गुन्हेगारी गुप्तवार्ता पथकाने जुहू येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये मंगळवारी छापा टाकून हायप्रोफाइल ‘कास्टिंग काऊच’ रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. हे सेक्स रॅकेट प्रेम उर्फ संदीप इंगळे असं या निर्मात्याचं नाव असून, अभिनेत्री तान्या शर्मा आणि मेकअप आर्टिस्ट हनुफा उर्फ तन्वी सरदार यांच्या मदतीने सुरू असल्याचं समजलं. त्यामुळं सिनेसृष्टीत खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनूसार अभिनय क्षेत्रात पदार्पण करु इच्छिणाऱ्या आठ उदयोन्मुख अभिनेत्री, मॉडेल यांची सुटका करीत एका निर्मात्यासह दोन महिलांना अटक केली. कॅलेंडर शूट, वेबसीरिज तसेच चित्रपटात भूमिका मिळवून देण्याच्या बहाण्याने या तरुणींकडून देहव्यापार करून घेतला जात होता.

गुन्हेगारी गुप्तवार्ता पथकाचे पोलिस अधिकारी सचिन वाझे यांनी बोगस ग्राहक तयार करून या तिघांशी संपर्क साधला. त्यानुसार तान्या आणि हनुफा यांनी व्हॉट्सअॅपवरुन पसंतीसाठी तरुणींचे फोटो पाठवले. तरुणी पसंत केल्यावर जुहू येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये येत असल्याचं या तिघांनी सांगितलं. वाझे यांच्यासह संतोष कोतवाल, रियाझुद्दीन काझी, नितीन लोंढे, कीर्ती माने, बिपीन चव्हाण, योगेश लोहकरे, म्हस्के यांच्या पथकाने हॉटेलमध्ये छापा टाकून आठ मुलींची सुटका केली.

दरम्यान, अटक करण्यात आलेल्या तिन्ही आरोपींची 22 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे या रॅकेटमध्ये चित्रपट, तसेच मॉडेलिंग क्षेत्रात बड्या व्यक्तींचा सहभाग आढळण्याची शक्यताही पोलिसांनी व्यक्त केली आहे.

थोडक्यात बातम्या-

…तर जयंत पाटील मुख्यमंत्री होणार; अजित पवारांनीही दिला पाठिंबा

प्रबोधनकारांशिवाय महाराष्ट्राचा इतिहास पूर्ण होऊच शकत नाही- उर्मिला मातोंडकर

“राजकीय हवा बदलली आहे, भाजपचे अनेक बडे नेते आमच्या संपर्कात”

अजिंक्यच्या नावाचा मराठी चित्रपटसृष्टीशी आहे हा जुना संबंध; मधुकर रहाणेंनी सांगितली नावामागची खास बात!

दिग्दर्शक अभिषेक कपूर सुशांतचे ‘हे’ स्वप्न पूर्ण करणार

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या