बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुन्हा हादरली मुंबई! अल्पवयीन मुलीवर 30 जणांकडून सामूहिक बलात्कार

मुंबई | राज्यात महिला, मुली सुरक्षित नसल्याचं चित्र दिवसेंदिवस वाढत असताना एक घटनेनं सर्वांच्या काळजाचा थरकाप उडवला आहे. काही दिवसांपुर्वी मुंबईत झालेल्या साकीनाका प्रकरणाने सर्वांना हदरवलं होतं. यानंतर आता मुंबईत पुन्हा एकदा संतापजनक घटना घडली आहे. 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर 30 जणांनी सामूहिक बलात्कार केला असल्याची घटना समोर आली आहे.

डोंबिवलीतील भोपर परिसरातील ही घटना आहे. डोंबिवलीमध्ये रहिवासी असणाऱ्या अल्पवयीन मुलीवर 30 जणांनी बलात्कार केला. पीडीत मुलीच्या प्रियकराने तिचा अश्लील व्हिडीओ रेकाॅर्ड केला होता. या व्हिडीओद्वारे तिला वारंवार ब्लॅकमेल करण्यात आलं. त्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यावर वेगवेगळ्या आरोपींनी बलात्कार केला.

हा प्रकार जानेवारी 2021 पासून सुरु असून मुलीने त्रासाला कंटाळून पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली आहे. यामधील 2 आरोपी अल्पवयीन असून उर्वरीत आरोपी 18 वर्षांवरील आहेत.

दरम्यान, या प्रकरणात असलेल्या 30 आरोपींपैकी 22 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. तसेच इतर आरोपींचा पोलीस शोध घेत असून याबाबतचा अधिक तपास करण्यात येत आहे. साकीनाका प्रकरणानंतर आता पुन्हा लोकांच्या मनात धडकी भरणाऱ्या या व्हिडीओने खळबळ उडवली आहे.

थोडक्यात बातम्या-

कागलनंतर सोमय्यांच्या रडारवर पारनेर साखर कारखाना!

ओबीसी आरक्षणाबाबत धक्कादायक माहिती समोर!

मोठी बातमी! नाना पटोले आणि बाळासाहेब थोरातांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट

‘या’ भारतीय कंपनीची इलेक्ट्रीक बाईक बाजारात दाखल; किंमत पेट्रोल बाईकपेक्षा कमी

“सरकारने घेतलेला निर्णय राजकीय सुडापोटी, अशा चौकशांना मी घाबरत नाही”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More