Siddhivinayak Temple | मुंबईतील सुप्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिर (Siddhivinayak Temple) प्रशासनाने भाविकांसाठी ड्रेस कोड (Dress Code) लागू केला आहे. या नियमानुसार, विहित केलेल्या पोशाखात (Prescribed Attire) नसलेल्या भाविकांना मंदिरात प्रवेश नाकारला (Entry Denied) जाणार आहे.
सिद्धिविनायक मंदिर न्यासाने (Trust) लागू केलेल्या या ड्रेस कोडवरून नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. भूमाता ब्रिगेडच्या (Bhumata Brigade) अध्यक्षा (President) आणि सामाजिक कार्यकर्त्या (Social Activist) तृप्ती देसाई (Trupti Desai) यांनी या नियमाला कडाडून विरोध दर्शवला आहे.
सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे म्हणणे काय?
सिद्धिविनायक मंदिर न्यासाने ड्रेस कोडसंदर्भात एक अधिकृत पत्रक (Official Circular) प्रसिद्ध केले आहे. भाविकांना संकोच वाटणार नाही असे कपडे त्यांनी परिधान करावेत, असे आवाहन या पत्रकात करण्यात आले आहे. तसेच, भारतीय पारंपारिक वेशभूषा (Indian Traditional Attire) किंवा अंगभर कपडे (Full Clothes) घालण्याची सूचनाही या पत्रकामध्ये देण्यात आली आहे. असे कपडे परिधान करणाऱ्या भाविकांनाच सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी प्रवेश दिला जाईल, असे मंदिर न्यासाने स्पष्ट केले आहे. (Siddhivinayak Temple)
“पुजाऱ्यांना पण हा नियम लागू करा”
तृप्ती देसाई यांनी या नियमाला विरोध दर्शवला असून, “सिद्धिविनायक मंदिरात आज ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे. मात्र हा निर्णय ताबडतोब मागे घ्यावा,” अशी आग्रही मागणी त्यांनी केली आहे.
“संविधानाने (Constitution) व्यक्ती स्वातंत्र्याचा (Personal Liberty) अधिकार दिला आहे. मंदिरात येणारा प्रत्येक जण श्रद्धेने (Faith) येत असतो. त्याचे कपडे न पाहता त्याची श्रद्धा पाहिली पाहिजे,” असे तृप्ती देसाई यांनी म्हटले आहे. “सिद्धिविनायक मंदिरातील पुजारी अर्धनग्न कपड्यात (Half-Naked) असतात. मग हा नियम फक्त भक्तांनाच (Devotees) का?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. “नियम करायचे असतील तर सगळ्यांसाठी करा,” असेही त्या म्हणाल्या.
“भक्तांना चांगलं कळतं…”
तृप्ती देसाई यांनी सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टने हा निर्णय मागे घेण्याची मागणी केली आहे. “मंदिरात कोणते कपडे घालायचे हे भक्तांना चांगलं कळतं, तुम्ही शिकवण्याची गरज नाही,” असा टोलाही त्यांनी लगावला आहे. (Siddhivinayak Temple)
Title : Mumbai Siddhivinayak Temple Dress Code Trupti Desai Opposes