Mumbai Train l उन्हाळ्याच्या (Mumbai Summer Travel) सुट्टीत कोकणात किंवा गावाकडे जाण्याचे नियोजन करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथे सुरू असलेल्या फलाट विस्तारीकरणाच्या कामामुळे 30 एप्रिल 2025 पर्यंत काही महत्त्वाच्या रेल्वेगाड्यांचे थांबे तात्पुरते दादर स्थानकावर हलवण्यात आले आहेत. तर काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. (Mumbai Summer Travel)
कोकणातून मुंबईकडे येणाऱ्या आणि मुंबईहून कोकणात (Mumbai – Kokan) जाणाऱ्या प्रवाशांची संख्या उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात वाढलेली असताना, अशा बदलामुळे प्रवाशांना अतिरिक्त खर्च आणि वेळेचा फटका बसतो आहे. त्यामुळे प्रवासाआधी गाडीचा थांबा आणि वेळ नक्की तपासण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे. (Mumbai – Kokan)
कोणत्या गाड्या प्रभावित? :
CSMT स्थानकावर सुरू असलेल्या कामाचा थेट परिणाम काही गाड्यांवर झाला आहे. यामध्ये मडगाव-CSMT तेजस एक्सप्रेस (22120) आणि जनशताब्दी एक्सप्रेस (20152) यांचा समावेश आहे. या दोन्ही गाड्या आता दादर स्थानकावरच थांबणार आहेत. याशिवाय, मंगळूर-CSMT एक्सप्रेस (22145) ही गाडी तात्पुरती रद्द करण्यात आली आहे.
CSMT स्थानकावर सध्या फलाट क्रमांक १२ आणि १३ चे काम सुरू असून, २४ डब्यांच्या गाड्यांसाठी जागा निर्माण केली जात आहे. याआधी फलाट क्रमांक १० आणि ११ चे विस्तारीकरण पूर्ण झाले आहे.
Mumbai Train l प्रवाशांना वेळ आणि पैशांचा अतिरिक्त भुर्दंड :
CSMT ऐवजी दादर येथे गाड्या थांबू लागल्याने अनेक प्रवाशांना लोकल ट्रेन, कॅब किंवा रिक्षा यांचा वापर करावा लागत आहे. परिणामी प्रवासाचा खर्च वाढत आहे आणि वेळही अधिक लागत आहे. विशेषतः मुंबईहून कोकणात जाणाऱ्या पर्यटकांसाठी किंवा सुट्टीत गावी जाणाऱ्यांसाठी ही माहिती अत्यंत आवश्यक ठरणार आहे.
रेल्वे प्रशासनाने स्पष्टपणे सांगितले आहे की, या बदलांमुळे निर्माण होणाऱ्या अडचणींबद्दल त्यांनी क्षमायाचना केली असून, काम पूर्ण झाल्यानंतर गाड्या पुन्हा CSMT स्थानकावर धावू लागतील. तोपर्यंत प्रवाशांनी प्रवासाआधी वेळापत्रक आणि थांबे तपासून नियोजन करावे.