मुंबई | राज्यात आता उन्हाची दाहकता जाणवायला लागली आहे. अनेक भागांमध्ये तापमानाचा पारा चढत आहे. परिणामी नागरिकांना काळजी घेण्याची गरज आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं मराठवाडा आणि विदर्भात नागरिकांना त्रास जाणवायला लागला आहे.
राज्यात काही भागात तापमान वाढत असताना डोंगर पायथ्याला मात्र हवामानात गारवा होता. पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात ढगाळ वातावरण पाहायला मिळालं आहे. कोकणासह महाराष्ट्रातील इतर भाग, केरळचा काही भाग, कर्नाटक, मध्य प्रदेश, या भागांमध्येही ढगाळ वातावरण असण्याची शक्यता आहे.
सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, सिंधुदुर्ग या जिल्हात हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाडा आणि विदर्भात मात्र तापमानाचा पारा वाढण्याची शक्यता आहे. तापमानात वाढ होत असल्यानं शेतकऱ्यांनी आपली काम उरकण्यास सुरूवात केली आहे.
दरम्यान, तामपानात अचानकपणे बदल होत असल्यानं नागरिकांना आरोग्याची काळजी देखील घ्यावी लागणार आहे. हवामान खात्याकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
थोडक्यात बातम्या –
मोठी बातमी! महेंद्रसिंग धोनीनं घेतला ‘हा धक्कादायक निर्णय
‘मोदी सरकारच्या काळात दलितांवर अत्याचार वाढले’; आठवलेंनी दिली संसदेत माहिती
टाटाच्या ‘या’ शेअरची कमाल; गुंतवणूकदार मालामाल
“पंडित जवाहरलाल नेहरूंच्या एका चुकीचे परिणाम आजही देश भोगतोय”
“महाराष्ट्र हा देशातच आहे, सांगा रे त्यांना कुणीतरी”
Comments are closed.