मुंबईत ‘टाईम्स नाऊ’ वृत्तवाहिनीच्या पत्रकारावर जीवघेणा हल्ला

मुंबई | टाईम्स नाऊ वृत्तवाहिनीचे पत्रकार हरमन गोम्स यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात गोम्स यांच्यासह त्यांचा मित्र गंभीर जखमी झाला आहे. 

पोलिसांनी गावदेवी पोलीस ठाण्यात अज्ञात हल्लेखोराविरोधात तक्रार दाखल केली आहे. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या हल्ल्याची गंभीर दखल घेतली आहे.

चार हल्लेखोर हरमन यांच्या घराबाहेर दबा धरुन बसले होते. हल्ला केल्यानंतर मित्राचा फोन सुद्धा घेऊन हल्लेखोर पसार झाले, असं हरमन यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे. 

मी केलेल्या कुठल्या बातमीमुळे माझ्यावर हल्ला झाले ते मला कळत नाहीये, मात्र मी पूर्ण खात्री करुनच सर्व बातम्या केल्या आहेत, असं हरमन यांनी म्हटलं आहे. 

महत्त्वाच्या बातम्या-

-…ही कागदपत्रं नसतील तर तुम्हाला घरपोच दारु मिळणार नाही!

-#MeToo | ज्येष्ठ पत्रकार विनोद दुवा यांच्यावर लैंगिक गैरवर्तनाचा आरोप

-साताऱ्याची जागा आरपीआयसाठी सोडावी; आठवलेंची उदयनराजेंकडे मागणी

-आम्ही 10 सर्जिकल स्ट्राईक करू; पाकिस्तानची भारताला धमकी

-मराठा समाजाला टिकणारं आरक्षण द्यायचंय- चंद्रकांत पाटील

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या