वायू प्रदूषण कमी करण्यासाठी मुंबई महापालिकेचा मोठा निर्णय!

Air Pollution

Air Pollution l मुंबईतील (Mumbai) वायू प्रदूषण कमी करण्यासाठी मुंबई महापालिकेने (Municipal Corporation) एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, कोळशावर चालणाऱ्या तंदूर भट्ट्यांवर बंदी घालण्यात येणार आहे. हॉटेलमालकांना ८ जुलैपर्यंत कोळशाऐवजी पर्यायी इंधनाचा वापर सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

पर्यायी इंधन वापरण्याचे आदेश :

महापालिकेने (Municipal Corporation) दिलेल्या आदेशानुसार, हॉटेल, रेस्टॉरंट आणि ढाब्यांमध्ये कोळशाचा वापर पूर्णपणे बंद करावा लागणार आहे. त्याऐवजी इलेक्ट्रिक उपकरणे किंवा सीएनजी (CNG), पीएनजी (PNG), एलपीजी (LPG) सारख्या पर्यायी इंधनाचा वापर करणे बंधनकारक असेल.

Air Pollution l ८४ आस्थापनांना नोटिसा :

मुंबई महापालिकेने (Municipal Corporation) आतापर्यंत ८४ ढाबे, रेस्टॉरंट आणि हॉटेल्सना नोटिसा पाठवल्या आहेत. कोळशाच्या भट्टीत भाजलेली तंदूर रोटी खवय्यांची खास पसंतीची असते, पण आता कोळशाऐवजी इतर इंधनांवर बनवलेली रोटीच खावी लागणार आहे.

ग्रीन एनर्जीचा वापर अनिवार्य :

उच्च न्यायालयाच्या (High Court) आदेशानुसार लाकूड किंवा कोळसा वापरणाऱ्या हॉटेल आणि रेस्टॉरंट मालकांना सूचना देण्यात आली आहे. त्यामुळे हॉटेलमालकांना आता हॉटेलमध्ये बदल करून इलेक्ट्रिक, एलपीजी (LPG), पीएनजी (PNG), सीएनजी (CNG) व इतर ग्रीन एनर्जीचा (green energy) वापर करावा लागणार आहे.

कारवाईचा इशारा :

मुंबईत रेस्टॉरंट, बेकरी आणि ढाबाचालकांची संख्या १००० हून अधिक आहे. बहुतेक जण विद्युत उपकरणांचा वापर करतात, पण अनेकजण अजूनही जुन्या पद्धतीचा अवलंब करत असून ढाब्यांवर सर्रासपणे कोळसा भट्टीचा वापर करतात. त्यामुळे, महापालिकेने (Municipal Corporation) याची दखल घेतली आहे. ८ जुलैपर्यंत आदेशाचे पालन न केल्यास परवाना रद्द करणे, दंड आणि कायदेशीर कारवाईसह कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.

News title : Mumbai to Ban Coal-Fired Tandoors; July 8 Deadline

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .