बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“पाकिस्तानी सैैन्याचा प्रमुख हा नवज्योत सिंह सिद्धूंचा पंजाबी भाऊ”

नवी दिल्ली | पंजाबचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंह सिद्धू यांनी मागील काही वर्ष भाजपमध्ये काम केलं होतं. मात्र काही काळानंतर त्यांनी भाजपला रामराम ठोकत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. याआधी करतारपूर काॅरिडरच्या उद्धाटनावेळी सिद्धू यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आणि सैन्य प्रमुख कमर जावेद यांची भेट घेतली होती. या भेटीवर भाजपने टीका केली होती. यावर आता पंजाब काँग्रेसचे प्रभारी आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री हरिश रावत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

पाकिस्तान सैन्याचा प्रमुख हा नवज्योत सिंग सिद्धूंचा पंजाबी भाऊ असल्याचं वक्तव्य हरिश रावत यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे आता पंजाबमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे. सिद्धू यांची पाकिस्तान सोबत असलेल्या मैत्रीवर भाजपने प्रश्न उपस्थित केले होते. त्यावर बोलताना सिद्धू यांनी हे वक्तव्य केलं आहे.

यावेळी हरिश रावत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर देखील निशाणा साधला आहे. नरेंद्र मोदी यांनी देखील तत्कालिन पाकिस्तानी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या वाढदिवसादिवशी गळाभेट घेतली होती, असं म्हटलं त्यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर देखील टीका केली आहे.

दरम्यान, सिद्धू यांची पाकिस्तानसोबत असलेली मैत्री भाजपमध्ये असताना देखील होती. मात्र काँग्रेसमध्ये आल्यानंतर ती सर्वांच्या डोळ्यांना खुपू लागली, असंही भाजपच्या टीकेला उत्तर देताना रावत यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-

‘भविष्यातही कोरोना महामारीपासून सुटका नाहीच’; गगनदीप कांग यांचं मोठं वक्तव्य

मराठवाड्यातील नद्यांना महापुराचा धोका; मुसळधार पावसामुळे काढणीला आलेली पिकं संकटात

किचनमध्ये काम करताना अचानक महिलेच्या केसांनी घेतला पेट अन्…; पाहा व्हिडीओ

पुणेकरांसाठी खुशखबर! पुण्याचा पाणीप्रश्न सुटला, मुळशी धरणातून ‘इतके’ TMC पाणी मिळणार

सांगा पाहू दबंग कोण?; अमोल मिटकरींनी मांडलं आघाडीचं गणित

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More