बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मुंबई लवकरच बुडणार?, नासाच्या अभ्यासातून अत्यंत धक्कादायक माहिती उघड

मुंबई | देशाची आर्थिक राजधानी आणि राज्याची राजधानी मुंबईवर मोठं अस्मानी संकट ओढावण्याची शक्यता आहे. नासानं केलेल्या अभ्यासातून ही माहिती समोर आली आहे. जागतिक तापमान वाढीमुळे मुंबईवर हे संकट ओढवण्याची शक्यता आहे.

वीस वर्षांमध्ये अरबी समुद्र हा मुंबईला बुडवू शकतो. कारण समुद्राच्या वाढत्या पाण्याच्या पातळीत 0.11 ते 0.14 मीटरने वाढ होणार असल्याचं नासाच्या अभ्यासातून समोर आलं आहे. नासाने समुद्राच्या पाण्याच्या पातळीच्या वाढत्या पाणी पातळीचा अभ्यास करण्यासाठी नासाने सी लेव्हल टूल तयार केलं असून त्यानुसार काढलेल्या अंदाजानुसार मुंबईच नाही तर समुद्र किनाऱ्याजवळ असणाऱ्या 12 शहरांना याचा धोका तयार झाला आहे.

सतत वाढणाऱ्या उष्णतेमुळे आणि कार्बन उत्सर्जनामुळे हिमनागर (ग्लेशिअर) वितळू लागले आहेत. वितळलेल्या ग्लेशिअरमुळे समुद्राच्या पाण्यात वाढ होत असल्याचं नासाच्या अभ्यासातून उघड झालं आहे. त्यामुळे दोन ते तीन दशकात समुद्राच्या पाण्यातील वाढ होत असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, मुंबईप्रमाणे गुजरातच्या ओखा, कांडला आणि भावनगर, गोव्यातील मोरमुगाओ, कर्नाटकमधील मंगळुरू, आंध्रप्रदेशमधील विशाखापट्टनम, ओडिसातील पारदीप आणि पश्चिम बंगालमधील किडरोपोर या शहरांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

थोडक्यात बातम्या- 

“फडणवीसांनी त्यांचं दिल्लीतील वजन वापरून बैलगाडा शर्यतीचा प्रश्न मार्गी लावावा”

गोरे गेलेत पण चोर आलेत; नाना पटोलेंची मोदी सरकारवर टिका, पाहा व्हिडीओ

“मोदी सरकार सत्तेत आल्यापासून लोकांचं जगणं मुश्कील झालं”

महिलांबद्दल ‘हा’ प्रश्न विचारताच तालिबानी हसायला लागले, ‘हा’ व्हिडीओ व्हायरल!

अफगाणिस्तानमध्ये जन्मलेल्या आर्शी खानला सतावतेय नातेवाईकांची चिंता, म्हणाली…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More