महाराष्ट्र दिनानिमित्त मुंबईतील वाहतुकीत मोठे बदल; ‘हा’ मुख्य रस्ता राहणार बंद

Mumbai News

Mumbai News | महाराष्ट्र दिनानिमित्त 1 मे रोजी मुंबईतील शिवाजी पार्क, दादर येथे परेडचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मुंबई वाहतूक पोलिसांनी वाहतुकीत मोठे बदल केले आहेत. शिवाजी पार्क परिसरातील अनेक रस्ते 1 मे रोजी सकाळी 6 ते दुपारी 12 दरम्यान बंद ठेवण्यात येणार आहेत. (Mumbai road diverted)

मुंबई पोलिसांनी सोशल मीडियावरून वाहनचालकांसाठी मार्गदर्शक सूचना जारी करत, वाहतूक वळवली जाणारी ठिकाणं, नो पार्किंग झोन आणि पार्किंग झोनची माहिती दिली आहे.

वाहतुकीतील महत्त्वाचे बदल :

केळुस्कर रोड (उत्तर आणि दक्षिण) – केवळ अधिकृत परवानगी असलेल्या वाहनांसाठी खुला, इतर वाहनांसाठी पूर्णतः बंद

एस के बोले रोड – सिद्धिविनायक जंक्शन ते पोर्तुगीज चर्च जंक्शनपर्यंत एकेरी वाहतूक

स्वातंत्र्यवीर सावरकर रोड – सिद्धिविनायक ते येस बँक जंक्शन दरम्यान प्रवेश बंद

Mumbai News | पर्यायी मार्ग :

वाहनचालकांसाठी वाहतूक पोलिसांनी पर्यायी मार्ग सुचवले आहेत:

पश्चिम उपनगरांकडे जाणारी वाहने: सिद्धिविनायक जंक्शन – एस के बोले रोड – पोर्तुगीज चर्च – गोखले रोड – एल. जे. रोड – राजा बडे चौक

दक्षिण मुंबईकडे जाणारी वाहने: येस बँक जंक्शन – पांडुरंग नाईक रोड – राजा बडे चौक – एल. जे. रोड – गोखले रोड

नो पार्किंग झोन :

खालील रस्त्यांवर वाहन पार्किंग पूर्णतः बंद राहील:

केळुस्कर रोड (उत्तर आणि दक्षिण)
पांडुरंग नाईक रोड
एनसी केळकर रोड (गडकरी चौक ते कोतवाल गार्डन)

पार्किंगसाठी उपलब्ध जागा :

वाहनचालकांसाठी काही विशिष्ट जागांवर पार्किंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे:

स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक सभागृह
वनिता समाज हॉल
महात्मा गांधी स्विमिंग पूल
कोहिनूर पीपीएल
एनसी केळकर रोड, दादर (प.)

News Title: Mumbai Traffic Diversion on Maharashtra Day 2025: Major Roads Closed Near Shivaji Park

Join WhatsApp

Join Now

संबंधित बातम्या

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .