बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

जास्त हाॅर्न वाजवा, जास्त वाट पाहा; मुंबई पोलिसांची भन्नाट युक्ती.. पाहा व्हिडीओ

मुंबई | ट्रॅफिकमध्ये थांबलो असताना गाडीचा हॉर्न वाजवणे आपल्याला नवे नाही. अनेकदा गरज नसतानाही लोक हॉर्न वाजवत राहतात. यातून होणाऱ्या ध्वनिप्रदूषणाकडे मात्र सगळेच सोयीस्करपणे दुर्लक्ष करताना दिसतात. यावर उपाय म्हणून मुंबई पोलिसांनी नामी युक्ती लढवली आहे.

मुंबईतील काही ट्रॅफिक सिग्नलवर ट्रॅफिक पोलिसांनी डेसिबल मीटर बसवण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार जेव्हा डेसिबल मीटरने 85 डेसिबलपेक्षा जास्त आवाजाची नोंद केली तर रेड सिग्नल परत एकदा लागणार आहे.

ट्रॅफिक सिग्नवर विनाकारण हाॅर्न वाजवणाऱ्यांना यामुळे लगाम बसण्याची शक्यता आहे. कारण तुम्ही हाॅर्न वाजवत राहिलात आणि आवाजाने 85 डेसिबलची मर्यादा ओलांडली तर तुम्हाला पुन्हा ग्रीन सिग्नल होण्याची वाट पाहावी लागणार आहे.

दरम्यान, मुंबई ट्रॅफिक पोलिसांनी लढवलेल्या या नामी युक्तीमुळे हॉर्न वाजवण्याने होणारे ध्वनिप्रदूषण कमी होण्याची शक्यता आहे. मुंबई पोलिसांची ही युक्ती कामाला आली तर इतर शहरातही ही पद्धत वापरता येणार आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

“सगळे निर्णय अजित पवार घेतायत अन् मुख्यमंत्री गोट्या खेळतायत”

हिटलरने जे जर्मनीत केलं तेच भारतात घडवण्याचा प्रयत्न; आव्हाडांचा घणाघाती आरोप

महत्वाच्या बातम्या-

प्रेमी युगलाला मारहाणीची घटना महाराष्ट्राला काळीमा फासणारी- सुप्रिया सुळे

आजही देशात नथूराम गोडसेची विचारधारा जिवंत- नवाब मलिक

राज ठाकरेंचं विद्युत आयोगाला पत्र; बेस्टच्या वीज दरवाढीवर मनसेचा आक्षेप

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More