मुंबईतील खड्ड्यांचं खापर उद्धव ठाकरेंनी चक्क पावसावर फोडलं!

मुंबई | शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील खड्ड्यांचं खापर चक्क पावसावर फोडलं.  मुबंईत पाऊसच इतका होतो की त्याला आपण तरी काय करणार?, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला आहे.

मुलुंडमधील अत्याधुनिक कालिदास नाट्यगृहाचं लोकार्पण उद्धव ठाकरेंच्या हस्ते करण्यात आलं. त्यावेळी ते बोलत होते.

मुंबई महापालिका कायम टीकेची धनी होते. जरा काही झालं की बीएमसीवर खापर फुटतं. मुंबईत पाऊस जोरात पडतो, त्याला महापालिका तरी काय करणार?, असं उद्धव म्हणाले.

थोडक्यात बातम्या मिळवण्यासाठी आमचं फेसबुक पेज आत्ताच लाईक करा…