राज्यपालांच्या भाषणाचा मराठीत अनुवाद नाही, विरोधकांचा गोंधळ

मुंबई | राज्यपालांच्या भाषणाचा मराठीत अनुवाद न केल्याने विरोधकांनी जोरदार गोंधळ घातला. तसेच विधानभवनातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

राज्यपालांचं अभिभाषण मराठीत अनुवादित न करून फडणवीस सरकारने मराठी भाषेचा अवमान केला आहे. मराठीचा अवमान करणा-या सरकारचा धिक्कार असो, असं विरोधकांनी म्हटलंय. 

दरम्यान, आजपासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झालीय. मात्र या अधिवेशनाची सुरुवातच गोंधळाने झाल्याचं दिसतंय.