देश

शहीद मेजर प्रसाद महाडिक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

मुंबई | शहीद मेजर प्रसाद महाडिक यांच्या पार्थिव लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. विरारमधील विराट नगरमधील स्मशानभूमीत त्यांच्यावर अत्यंविधी पार पडले. 

तवंग-अरूणाचल सीमेवर दारुगोळ्याची तपासणी करताना टँकच्या आगीमुळे झालेल्या स्फोटात त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनं त्यांचं मूळगाव असलेल्या गुहागर तालुक्यातील कुटगिरीमध्ये शोककळा पसरलीय. 

दरम्यान, पार्थिव काही काळ त्यांच्या विरारमधील घरी अंत्यसंस्कारासाठी ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी आणि धाकटी बहीण असा परिवार आहे.

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या