Mumbai water Cut | मुंबई महानगर पालिकेने पाईपलाइन दुरुस्तीची कामे हाती घेतली असल्याने काही भागांमध्ये पाणी पुरवठा बंद असणार आहे. त्यामुळे नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन करण्यात आलंय.
पाइपलाइन आणि देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी मुंबईत करी रोड, डिलाईल रोड, लोअर परळमध्ये येत्या 6 आणि 7 जूनरोजी पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. नागरिकांनी याची दखल घेऊन पाणी साठा करावा, असं मुंबई महापालिकेने म्हटलं आहे.
‘या’ भागात पाणी पुरवठा बंद राहणार
या कामा अंतर्गत ‘जी दक्षिण’ विभागातील रेसकोर्स येथे प्रत्येकी 1 हजार 450 व्यासाच्या तानसा (पूर्व) व तानसा (पश्चिम) या प्रमुख जलवाहिन्यांच्या दुरुस्तीचे काम केले जाणार आहे. या कामामुळे जी दक्षिण विभागातील पाणीपुरवठा 6 जूनपासून 7 जून रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत बंद राहील.
पालिकेला सदरील काम करण्यासाठी साधारण 17 तासांचा अवधी लागणार आहे. त्यामुळे करी रोड, सखाराम बाळा पवार मार्ग, महादेव पालव मार्ग, डिलाईल रोज, बीडीडी चाळ, लोअर परळ (Mumbai water Cut) येथील पाणी पुरवठा हा पूर्णपणे बंद राहील.
राज्यात पाणी टंचाईच्या तीव्र झळा
दुसरीकडे राज्यात देखील बऱ्याच (Mumbai water Cut) ठिकाणी पाणी टंचाई जाणवू लागली आहे. राज्यात असलेल्या बहुतांश धरणांनी तळ गाठला असल्याने पाण्यासाठी नागरिकांची वणवण होत आहे. मराठवाडा, विदर्भात अनेक जिल्ह्यात पाणी टंचाईने भीषण रूप धरण केलंय.
अनेक ठिकाणी टँकरच्या साह्याने पाणी पुरवठा केला जातोय. राज्यात अद्याप मॉन्सूनच्या पावसाला सुरुवात झालेली नाही. त्यामुळे पुढील काही दिवस पाणी जपून वापरा, असं आवाहन करण्यात आलंय.
News Title – Mumbai water Cut june
महत्त्वाच्या बातम्या-
आयफोनला टक्कर देण्यासाठी रियलमीचा स्वस्तात मस्त स्मार्टफोन लाँच; जाणून घ्या किंमत
…म्हणून जालन्यात महाविकास आघाडी बाजी मारणार?
प्रवास करणे महागले; टोल टॅक्सच्या किंमती तब्ब्ल ‘इतक्या’ रुपयांनी वाढल्या
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; या तारखेला मान्सून महाराष्ट्रात धडकणार
सर्वसामान्य नागरिकांना मोठा झटका, दुधाच्या किंमतीत वाढ